शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

तलाव आटला; विहिरींमध्येही ठणठणाट !

By admin | Updated: August 11, 2015 23:26 IST

ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईच्या झळा : पाचूंद, मेरवेवाडी, कामथी, वाघेरीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

बाळकृष्ण शिंदे- शामगाव  ऐन पावसाळ्यात दुष्काळी शामगाव विभागातील विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच या विभागाची तहान भागविणाऱ्या मेरवेवाडी तलावातही ठणठणाट आहे. त्यामुळे काही दिवसातच परिसरातील गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार असल्याचे चित्र आहे. परिणामी, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या घाटमाथ्यावरील व घाटालगतच्या गावांमध्ये पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट पडू लागले आहे. छोटे मोठे बंधारे आटले आहेत. तर मोठ्या तलावातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. आॅगस्ट महिना उजाडला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने पहिला हंगाम पूर्ण वाया जाणार आहे. त्याचबरोबर या दुष्काळी गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार आहे. मेरवेवाडी तलावातून मेरवेवाडी, पाचुंद, वाघेरी, कामथी या गावांना पाणी पुरवठा केला जातो. या तलावातून शेतीला पाणी दिले जात नाही; परंतु तलावाखाली असणाऱ्या विहिरींना याचा फायदा होतो. त्यामुळे येथील वीस ते तीस एकरांचा पट्टा हिरवागार दिसतो; परंतु यंदा दरवर्षीपेक्षा पाणी पातळी जास्त घटल्याने या चार गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार आहे. पाचुंद सारख्या गावात पाण्याचा कसलाही स्त्रोत नसल्याने स्थलांतर करावे, हाच पर्याय ग्रामस्थांसमोर राहिला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे विहीरी, तलाव आटले असून कुपनलिकाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गावात पाणी पुरवठा योजना असुनही त्याचा उपयोग होत नाही. सध्या दोन दिवसातून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवारात कोठेही पाणी नाही.- महेश जाधव, सरपंच, पाचूंद १ वळीव पावसानेही पाठ फिरविलीकऱ्हाड तालुक्यात यावर्षी ठिकठिकाणी जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यावेळीही शामगाव विभागात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. वळीव पाऊस चांगला झाला असता तर त्याचा विहीर, तलावातील पाणीसाठ्याला फायदाच झाला असता. मात्र, पाऊसच न झाल्याने विहीर व तलावात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मान्सून पाऊसही या विभागात पडत नाही. त्यामुळे काही दिवसांतच या विभागाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. ही परिस्थिती ओळखून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. पाचंूद : गावाची लोकसंख्या सुमारे ६०० असून गावात ९ विहीरी आहेत. मात्र, सध्या एकाही विहीरीत पाणी नाही. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. २ मेरवेवाडी : गावामध्ये पाणी साठवण तलाव आहे. मात्र, या तलावातील पाण्याची पातळी पूर्णत: घटली आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ७०० आहे. गावात सुमारे ३५ विहीरी असून या विहीरीत सध्या जनावरांना पिण्यापुरतेच पाणी उपलब्ध आहे. गावात असणाऱ्या तीनपैकी एकाच कुपनलिकेला पाणी आहे.३ कामथी : कामथी हे विभागातील मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या १ हजार ५० आहे. या गावात सुमारे ५० विहीरी आहेत. मात्र, सध्या या विहीरीत जेमतेम पाणी उपलब्ध आहे. गावात असणाऱ्या ६ पैकी ३ कूपनलिका चालूस्थितीत आहेत. ४ वाघेरी : गावाची लोकसंख्या ४ हजारच्या आसपास आहे. येथे दोनशेहून अधिक विहीरी आहेत. मात्र, या विहीरींची पाणीपातळी सध्या चांगलीच घटली आहे. गावातील ६ पैकी फक्त दोन कुपनलिका सुरू आहेत.