शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसलाय दीर

By admin | Updated: October 9, 2015 21:51 IST

सदस्याचा आरोप : कोरेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

वाठार स्टेशन : परतवडी सरपंचांच्या खुर्चीवर महिला सरपंचाचा दीरच बसला आहे. व्यक्ती ग्रामसेवक व सदस्यांसमोर सतत बसून या खुर्चीचा अवमान करत आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्या आशा नवनाथ दिसले यांनी कोरेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सरपंचपदाची खुर्ची ही गावासाठी भूषणावह आहे. या खुर्चीवर बसण्याचा अधिकार हा दुसऱ्या कोणासही नाही. सरपंच आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. खुर्चीचा अवमान होत असताना पाहत बसणाऱ्या अथवा अशा लोकांना अटकाव करण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकाची तातडीने बदली करावी, अन्यथा गावातील सर्वांनाच या खुर्चीवर बसण्यास परवानगी द्यावी. ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही त्या गावच्या विकासाचा कणा समजली जाते. ग्रामीण भागातील या ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आगामी काळात गावच्या लोकसंख्येनुसार वर्गवारी करत शासन विकासासाठी निधी ग्रामपंचायतींना देण्याच्या तयारीत आहे. गावचा कारभार करणारी ही स्थानिक स्वराज्य संस्था सुरळीत चालविण्यासाठी सरपंच व शासनाचा अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांची जबाबदारी मोठी आहे. सरपंचपद हे नेहमीच त्या गावासाठी भूषणावह असते. त्या पदासाठी अनेकवेळा सत्ता संघर्षही होतात. सरपंचाच्या खुर्चीचा हव्यास सर्वांनाच असतो, म्हणून कोणी या खुर्चीवर बसण्याचे धाडस करत नाही. सरपंचपदाचा मान हा नेहमीच मोठा आहे व तो राहावा, अशीच भावना ग्रामस्थांची आहे. (वार्ताहर)म्हणणे मांडण्यासाठी बजावल्या नोटिसापरतवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतमधील सरपंचांच्या खुर्चीचा अवमान होत असल्याबाबत केलेल्या तक्रार अर्जाबाबत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, संबंधित व्यक्ती, संगणक आॅपरेटरांनी १९ आॅक्टोबर रोजी कोरेगाव पंचायत समितीत उपस्थित राहून आपापले म्हणणे मांडण्याबाबत चौकशी अधिकारी सी. एन. घारे यांनी नोटिसी बजावल्या आहेत. याबाबतचा निर्णय यादिवशी स्पष्ट होणार आहे.परतवाडी ग्रामपंचायतीत खुर्च्यांची कमतरता आहे. २ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा होती. या सभेचे अध्यक्ष संबंधित व्यक्ती असल्याने ते या ठिकाणी बसले होती. परंतु तक्रारदार या सभेस अनुपस्थित असताना त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेली तक्रार योग्य नाही. संबंधित व्यक्ती यापूर्वी एकवेळ या खुर्चीवर बसलेली असताना मी ग्रामसेवक या नात्याने त्या खुर्चीवर बसू नये, अशी त्यांना विनंती केली होती.- शेखर लंगुटे, ग्रामसेवक परतवडी चौकशीची मागणी; संबंधितांवर कारवाई परतवडी ग्रामपंचायतीमधील हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना कोरेगावच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे म्हणाल्या, ‘परतवडी ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत दिलेले निवेदन मिळाले आहे. याबाबत तक्रारदार, संबंधित व्यक्ती व सरपंच यांचे म्हणने ऐकून घेऊन हा प्रकार सत्य असेल, तर संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे.