शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शिव्या कमी.. कलकलाट फार !

By admin | Updated: August 8, 2016 23:35 IST

बोरीचा बार : रिमझिम पावसात बोरी अन् सुखेडच्या महिलांनी जपली परंपरा

लोणंद : खंडाळा तालुक्यातील बोरी अन् सुखेड या गावच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. दोन्ही गावांतील महिला समोरासमोर येऊन एकमेकींना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देण्याची परंपरा आहे. मात्र, बदलत्या काळानुसार शिव्यांची पद्धत काहीशी मागे पडत केवळ कलकलाट ऐकायला मिळतो. यंदाही सोमवारी दुपारी ‘बोरीचा बार’मध्ये रिमझिम पावसात शिव्या कमी पण कलकलाट अधिक ऐकायला मिळाला. या गावातील ओढ्याच्या काठी दोन्ही गावांतील महिला दुपारी सवाबारा वाजता मिरवणुकीद्वारे समोरासमोर आल्या. रिमझिम पावसात या ठिकाणी आल्यानंतर हलगीच्या तालावर, तुतारीच्या निनादात बोरीचा बार रंगला. मात्र, यंदा ओढ्यात पाणी असल्याने महिलांच्या उत्साहावर पाणी फिरले. यावेळी कलकलाटच अधिक झाला.या ओढ्यात दोन्हीकडच्या महिला प्रतिस्पर्धी गावातील महिलेला ओढत आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या महिलेला ओढत आपल्या हद्दीत आणले जाते, तिला नंतर साडी-चोळीचा आहेर केला जातो. यंदा मात्र, परिसरात चांगला पाऊस असल्याने केवळ ओढ्याच्या काठावर उभे राहून हातवारे करत कलकलाट करावा लागला. सुमारे अर्धा तास हा शिव्यांचा बार रंगला होता. ओढ्यात पाणी होते. या पाण्यात उतरून हाताने दुसऱ्या महिलांच्या अंगावर पाणी उडविण्यात येत होते. या बोरीच्या बारमुळे बोरी आणि सुखेड या दोन्ही गावांना यात्रेचे स्वरूप आले होते. लहान मुलांसाठी खेळणी, मिठाईची दुकाने थाटली गेली होती. सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले व सहकाऱ्यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. (वार्ताहर)पाणी अंगावर शिंपत शिव्यामहिलांनी बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसात महिला बोरीचा बार घालत होत्या. ओढ्यातील पाणी अंगावर शिंपत हातवारे करून महिला शिव्या देत होत्या. दुसरीकडे महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्या देणाऱ्या महिलांना आवरणे कठीण झाले होते.