शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी--परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:56 IST

मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे.

ठळक मुद्देहायब्रीड, सोयाबीन, भुईमुगाचे नुकसान; पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे. तर सोयाबीनसह भुईमुगाची पिके कुजत असल्यामुळे हातात आलेल्या पिकांचे वाटोळे होत आहे. एका बाजूला निसर्ग तर दुसºया बाजूला सोयाबीन खरेदी बंद अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिसकावला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात सध्या गडगडाटासह जोरदार पाऊस रोजच हजेरी लावत आहे. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक येत असलेल्या जोराच्या पावसामुळे भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.

पावसाने खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढणीचा हंगाम सुरू असलेल्या सोयाबीन व भुईमूग पीक शेतातच कुजत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच या नगदी पिकांचे वाटोळे होत असल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. हायब्रीड, ज्वारी हे खरीप हंगामातील पीक चांगले आले होते. महामार्गाच्या पश्चिमेकडील नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगावसह अनेक गावांत हायब्रीड ज्वारीचे पीक सध्या जोमात आले आहे. मात्र, सततच्या पावसाने हे पीक काळे पडले आहे. वर्षभराची खाण्याची सोय होणार, अशी आशा लागलेल्या शेतकºयांच्या चिंतेत भरच पडत आह

मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. भेंडी, गवारी यासारख्या शेंगवर्गीय भाजीवर सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.गुºहाळाची घरघर थांबलीगणेशोत्सवाच्या मुहूर्तावर चचेगावसह परिसरातील काही गुºहाळ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र, महिन्यापासून जोरदार पावसामुळे शेतकºयांच्या रानात पाणी साचल्यामुळे उसाची वाहतूक करण्यात अडचणी येत आहे. परिणामी, व्यावसायिकांना गुºहाळाची घरघर थांबवावी लागली आहे. याचा परिणाम म्हणून गुºहाळात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे संसार चालविण्यासाठी गुºहाळ मालकाला पदरमोड करावी लागत आहे. गुºहाळाची घरघर थांबली.सर्वांचा पोशिंदा दुहेरी संकटातएका बाजूला सातत्याने अतिवृष्टीमुळे पिके काढता येत नसल्यामुळे रानातच कुजत आहेत. म्हणून शेतकºयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून शेतकºयाने काढलेल्या मालाला हमीभाव देण्यावरून व्यावसायिकांनी सोयाबीन खरेदी बंद केली आहे. अशा संकटालाही शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे. एकूणच सर्वांचा पोशिंदा सध्या दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.