शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटच्या राजेंची कुर्लेत गादी

By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST

राजाचे कुर्ले : संस्थानकालीन शिवालयाचा गिरिजाशंकर म्हणून लौकिक

राजीव पिसाळ -पुसेसावळी अक्कलकोट येथून तुळजाजी भोसले यांनी १७५८ मध्ये खटाव तालुक्यातील कुर्ले येथे गादी स्थापन केली, तेव्हापासून कुर्ले गावाची ओळख ‘राजाचे कुर्ले’ अशी झाली. स्वतंत्र संस्थान म्हणूनही राजाचे कुर्लेचा लौकिक आहे.तुळजाजी भोसले यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजीराजे गादीवर बसले. काही दिवसांनंतर काही बेलदार समाजातील लोक इमारतीसाठी लागणारा दगड काढण्यासाठी पठारावर गेले असता त्यांच्या पारेला रक्त लागले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाजवळ कथन केला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एक स्वयंभू पिंड सापडली. त्या जागेवर शिवाजीराजे भोसले यांनी शिवालय बांधले. तेच सध्याचे गिरिजाशंकर मंदिर म्हणून प्रसिद्ध देवस्थान झाले आहे.देवालयाचा गाभारा व मंडप पूर्णपणे दगडाने बांधला होता. बाहेरचा मंडप हा लाकडी होता. सध्याचे संग्रामसिंहराजे भोसले व समरजितराजे भोसले यांच्या पणजी सरस्वतीबाई राजे भोसले यांनी तो लाकडी मंडप काढून त्या ठिकाणी जर्मनहून लोखंड व पत्रे आणून सद्याचा सभामंडप बांधला. संस्थान विलीन होण्याअगोदर राजवाड्यात अनेक महोत्सव साजरे होत असते. दसऱ्याच्या दिवशी राजवाड्यासमोर आपट्याच्या पानांचे पूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम होत असे. गावात प्रामुख्याने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गिरिजाशंकर मंदिरासमोर यात्रा भरते. परंतु गिरिजाशंकरवाडी व राजाचे कुर्ले या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यामुळे गिरिजाशंकरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी यात्रा भरविली जाऊ लागली. तर कुर्ले ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीस यात्रा भरते. या यात्रेच्या वेळेस कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले जाते. नामांकित मल्ल यात सहभागी होतात. महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता शिवलिंगापासून ते बाहेरच्या दरवाजापर्यंत लाखो रुपयांचा कापूर आरती झाल्यानंतर जाळला जातो. गावात संस्थान काळातील गणपतीचे मंदिर आहे. ग्रामदैवत म्हणून धाकुबाईचे मंदिर आहे. श्रावणातील नागपंचमी दिवशी धाकुबाई देवीच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढली जाते. त्याच दिवशी सप्ताह सुरू होऊन दररोज कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतात. सातव्या दिवशी त्याची सांगता केली जाते.