शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदीतील साड्या गरजू महिलांना दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.कन्यागत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक गरुड, सचिव ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.कन्यागत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक गरुड, सचिव विश्वनाथ जोशी, सुधीर कुलकर्णी, पराग देशमुखे, मनोहर इनामदार, अग्निशामक दलाचे अनिल डुबल, उत्तम डेस्के, आनंद माने आदी अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष नदीतील साडी काढण्यास प्रारंभ करण्यात आला. कन्यागत पर्व समितीतील पदाधिकाºयांसह कर्मचाºयांनी बोटीच्या साह्याने कृष्णानदी पात्रातून पलीकडे जात तेथील साडी घेऊन परत आले. सुमारे दोन तास इतका वेळ साडी काढण्यासाठी लागला. सकाळी साडेअकरा वाजता सुरू करण्यात आलेले काम हे दुपारी दीड ते दोन वाजता संपविण्यात आले. साडी काढल्यानंतर ती यावेळी उपस्थित सहा ते सात महिलांनी वेगवेगळी केली. तसेच त्या साड्या उन्हामध्ये सुकविण्यात आल्या. त्यानंतर त्यांची एकत्रित घडी घालण्यात आली. यावेळी या कामास वेदांत करिअर अ‍ॅकॅडमीचे सोळा विद्यार्थी तसेच परिसरातील महिलांनीही सहकार्य केले.एकूण १२५ साड्या एकत्रित करून तयार करण्यात आलेली साडी नेसविल्यात आल्याने ती विभक्त करण्यासाठी महिला तसेचसदस्यांना दोन ते तीन इतका तास वेळ लागला. विभक्त केलेल्या साड्यांपैकी २५ साड्या या सैदापूर येथील ग्रामस्थांना देण्यात आल्या.तसेच प्रीतिसंगम घाट परिसरातील पालिकेच्या व इतर सफाई करणाºया महिलांना २५ साड्यांचे वाटप करण्यात आले. यातून इतर बाकी राहिलेल्या साड्यांचे वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कन्यागत पर्व काळात तेरा महिने रोज नदीची आरतीबारा वर्षातून एकदा आलेल्या कन्यागत पर्व काळात कºहाडच्या कृष्णा नदीकाठी १२ आॅगस्ट २०१६ रोजी महाआरतीने प्रारंभ करण्यात आला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत तेरा महिने दररोज न चुकता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नदीचे पूजन करून आरती करण्याचे सुरू होते.धार्मिक विधीबरोबर नदी स्वच्छतेकडेही लक्ष१२ आॅगस्ट२०१६ रोजी कन्यागत महापर्वास प्रारंभ करण्यात आला. त्याची सांगता मंगळवारी १२ सप्टेंबर २०१७ रोजी कृष्णामाई नदीस साडी नेसवून तसेच १०१ कन्यापूजनाने झाली. यावेळी कन्यागत समितीच्यावतीने करण्यात आलेल्या धार्मिक विधीबरोबर नदी स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. समितीच्यावतीने नदीस साडी नेसवून तसेच महाआरती करण्यात आली.