शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाईकरांच्या पुढाकारातून कृष्णा बनली पावन !

By admin | Updated: June 20, 2016 00:18 IST

नदीतून शेकडो टन कचरा हद्दपार : प्रशासन, लोप्रतिनिधीसह सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग

 वाई : वाई नगरपालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रविवारी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधीसह विविध सामाजिक संस्था आणि शेकडो नागरिकांनी कृष्णा नदीची स्वच्छता केली. नदीपात्रातून शेकडो टन कचरा काढण्यात आला. त्यामुळे स्वच्छ वाहते कृष्णामाई असे चित्र निर्माण झाले आहे. या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ आमदार मकरंद पाटील, प्रांत अस्मिता मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, पंचायत समिती सभापती उमा बुलुंगे, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रशासनाने सामाजिक संस्था व नागरिकांचे वेगवगळे गट तयार करून कृष्णा नदीवरील सात घाटांवर एकाच वेळी स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. गंगापुरी घाटावर समूह संस्था, टीम आॅक्सिजन व कृष्णामाई संस्थान, मधली आळी हिंदुस्थान प्रतिष्ठान, भगवा कट्टा प्रतिष्ठान, गणपती आळी घाट, ज्येष्ठ नागरिक केंद्र, सहयोग ध्यान केंद्र, नानासाहेब धर्माधिकारी संस्था, महागपती घाट अनिरूध्द उपासना फाउंडेशन, जनविकास प्रतिष्ठान, रोटरी क्लब, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धर्मपुरी घाट आर्ट आॅफ लिव्हींग, पतंजली योग समिती, आस्था संस्था, सुयश प्रतिष्ठान, असंघटित महिला संस्था व नागरिक, भीमकुंड आळीत महिला गु्रप, कृष्णामाई संस्थान भीमकुंड आळी, रविवार पेठ व सोनगिरवाडी स्मशानभूमी परिसरात दोन जेसीबी, सात ट्रक व सर्व कर्मचारी या घाटावर स्वच्छता करीत होते़ जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर, डंपर व इतर स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करण्यात आले होते़ गवत, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून सोनापूर कचराडेपोत टाकण्यात आले. तसेच जेसीबी, पोकलेनच्या साह्याने प्रत्यक्ष नदीपात्रातील घाण, जलपर्णी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे़ (प्रतिनिधी) कृष्णा नदीला सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व असून तिचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे़ नदी अस्वच्छ होण्याची अनेक कारणे असून त्यांची सोडवणूक केली जाणार आहे़ त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासू देणार नाही़ या अभियासाठी वाईकरांचे मोलाचे सहकार्य आहे. - आ़ मकरंद पाटील वाई हे एक पर्यटनाचे ठिकाण असून कृष्णा नदी व त्यावरील सात घाट तसेच विविध मंदिरे ही वाईची भूषणे आहेत़ यांची स्वच्छता राखणे व त्यांचा विकास करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.़ - भूषण गायकवाड, नगराध्यक्ष, वाई आम्ही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असून महिन्यातील दोन रविवारी वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छता अभियान चालू असते. स्वच्छता अभियानात अजून मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला पाहिजे. - दिलीप डोंबिवलीकर, सामाजिक संस्था कृष्णा नदी स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व आ़ मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनुसार प्रत्यक्ष स्वच्छता अभियाचे नियोजन केले होते. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे़ - आशा राऊत, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका