शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा च्या निवडणुकीत इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

कराड- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित ...

कराड- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. साम-दाम-दंड-भेद सर्वप्रकारे या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत सभासदांना हवे असणारे लोक सत्तेमध्ये येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना हा दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या विचारांतून उभा राहिला आहे. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या प्रेमाखातर आणि या दोन्ही कुटुंबाशी असणारे संबंध पाहता डाॅ. पतंगराव कदम हे त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या कार्यक्रमाला कराडमध्ये आले होते, अशी आठवण सांगून मंत्री कदम म्हणाले, कृष्णा कारखाना निवडणुकीत पलूस, कडेगाव तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझी यंत्रणा सक्षमपणे राबविणार आहे. हा कारखाना इंद्रजित मोहिते यांच्या ताब्यात देण्यासाठी जे काय लागेल, ते करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.

इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांचे मनोमिलनबाबत बोलताना ते म्हणाले, मनोमिलन होण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची गरज आहे. एकतर्फी किंवा लादून एकत्र येण्यात कसलाही अर्थ राहणार नाही. कारखान्यातील सभासदांच्या हितासाठी कराड आणि वाळवा तालुक्‍यातील सर्व नेत्यांना मी व्यक्तिशः भेटलो आहे आणि भेटणार आहे. निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी कशीही होओ, मी इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे असणार आहे. कारखान्यात चांगल्या विचारांचे लोक सत्तेत यावेत, यासाठी माझा प्रयत्न राहील.

चौकट

कोरोनाच्या कालावधीत राज्यातील सर्व पत्रकार स्वतःचा जीव मुठीत धरून काम करीत आहेत. त्या सर्व पत्रकारांना वयाची अट न घालता कोविड प्रतिबंधक लस देण्याची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालणार आहे. पत्रकारांचा समावेश फ्रन्टलाइन वारियर म्हणून करावा, असा माझा आग्रह असणार आहे, असे मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.

चौकट

दरम्यान, मंत्री विश्वजित कदम व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली.‌ सदरची चर्चा ही कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भात झाली, पण त्याचा तपशील समजू शकला नाही.