शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोयना पुलावरून युवतीची नदीत उडी

By admin | Updated: February 4, 2017 00:01 IST

कऱ्हाडातील घटना; शोध सुरू; पर्ससह इतर साहित्य आढळले

कऱ्हाड : येथील नवीन कोयना पुलावरून महाविद्यालयीन युवतीने नदीपात्रात उडी घेतली. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात संबंधित युवतीचा शोध घेतला जात होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथे कोल्हापूर नाक्यानजीक कोयना नदीवर पूल असून, या पुलाच्या फूटपाथवर दुपारी एक युवती थांबली होती. काही वेळानंतर संबंधित युवतीने कोणाला काही समजण्यापूर्वीच नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार एका युवकाच्या निदर्शनास आला. त्याने त्याठिकाणी धाव घेऊन युवतीपाठोपाठ नदीत उडी घेतली. त्याने युवतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये त्याला अपयश आले. युवती न सापडल्याने संबंधित युवक नदीपात्रातून बाहेर पडला. दरम्यान, ही घटना समजताच पुलावर बघ्यांची गर्दी झाली. तसेच काही वेळात शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी युवती पाठोपाठ नदीत उडी घेणाऱ्या युवकाकडे चौकशी केली. सर्व घटनेची माहिती त्याच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर काही पाणबुडे नदीपात्रात उतरले. त्यांनी नवीन पुलापासून कृष्णामाई घाटापर्यंत नदीपात्रात शोध घेतला. मात्र, संबंधित युवती आढळून आली नाही. शोध सुरू असतानाच पाणबुडींना नदीपात्रात एक पर्स व इतर साहित्य आढळून आले. त्या पर्समध्ये आढळलेल्या साहित्यावर पौर्णिमा प्रकाश अरबुणे (रा. नांदगाव) असे नाव आहे. नदीपात्रात उडी घेतलेल्या युवतीचेच ते साहित्य असावे, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधित युवतीही घरातून बेपत्ता असून, नातेवाईकही तिचा शोध घेत आहे. कोयना नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात येत होता. मात्र, युवती सापडली नव्हती. अखेर अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)