शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मकरंद आबांच्या हाती कासरा

By admin | Updated: May 28, 2017 23:41 IST

मकरंद आबांच्या हाती कासरा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्यांनी राज्यात संवाद यात्रा सुरू केली आहे. गावोगावच्या शेतातील बांधावर जात त्यांनी संवाद सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे वाई विधानसभा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांनी कोणत्याही महागड्या चारचाकीत न बसता बैलगाडी चालवत आपण पूर्वीपासूनच शेतकऱ्यांशी संवाद साधत असल्याचा संदेश दिला. वाई तालुक्यातील बावधनमधील त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हटले की महागडी चार चाकी कार त्यांच्याकडे असते. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा लवाजामा असतो. हे चित्र सर्वत्र दिसत असते. असे असले तरी वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी चक्क बैलगाडीतून सफर केली. ऐवढेच नाही तर स्वत: बैलगाडी चालविण्याचा आनंदही घेतला. शेतकरी पार्श्वभूमी असल्याने मकरंद पाटील यांनी बावधन येथील भेटीत स्वत: बैलगाडी चालविण्याचा हा आगळावेगळा आनंद घेतला आहे. याचे असे झाले की, बावधन येथील मदन माधवराव भोसले हे प्रगतशिल शेतकरी आमदार मकरंद पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी नुकतीच नवीन डौलदार बैलजोडी खरेदी केली आहे. ही बैलजोडी पाहण्यासाठी त्यांनी आमदार पाटील यांना निमंत्रण दिले होते. आपल्या कामात व्यस्त असलेले आमदार पाटील वेळ काढून भोसले यांच्या शेतावर गेले. नवीन बैलजोडी पाहून त्यांच्यातील शेतकरी जागा झाला आणि त्यांनी चक्क बैलाचा कासरा हातात घेतला. बैलांना थोडे शेतातच फिरविले आणि बैलगाडीला जुंपले. बैलगाडीत बसून त्यांनी एक फेरी मारली.