शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोपरगाव, श्रीरामपुरात मोर्चा; राहुरीत रास्ता रोको

By admin | Updated: July 19, 2016 23:48 IST

कोपरगाव : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोपरगावात कडकडीत बंद पाळून तहसीलवर मोर्चा नेण्यात आला.

कोपरगाव : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोपरगावात कडकडीत बंद पाळून तहसीलवर मोर्चा नेण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. सकाळी येवला नाक्यापासून दुचाकीवरून निषेध रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची निषेध सभा झाली. सभेत गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, भारतीय जनता पार्टीचे विजय वहाडणे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक महेमूद सय्यद, सपना मोरे, दिप्ती वरकड, सुधीर डागा, डॉ. अजय गर्जे, गणेश वाणी, डॉ.अतिष काळे, सोनल पोळ, संदीप वर्पे, विमल पुंडे, अ‍ॅड. जयंत जोशी आदींची भाषणे झाली. सर्वांनी हा खटला ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली. सभेनंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार प्रशांत खेडेकर यांना निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. दलित संघटनेकडून निषेधशिर्डी: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार व खून घटनेचा राहाता तालुका दलित संघटनेच्या वतीने निषेध करत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रामराव गायकवाड, अ‍ॅड. अनिल शेजवळ, सचिन गायकवाड, नितिन शेजवळ, अमोल खरात, नाना त्रिभुवन, अलकाताई शेजवळ, शंकर त्रिभुवन, देवानंद शेजवळ, बापु शेजवळ, सचिन शेजवळ, रवि साळवे, शिमोन जगताप, राजेंद्र दुनबळे, एकनाथ सावंत, प्रदीप बनसोडे,तुषार सदाफळ, किरण शेजवळ उपस्थित होते.राहुरीत रास्ता रोकोराहुरी : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राहुरी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला़नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ आंदोलकांच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले़ यापुढील काळात अशा घटना होणार नाही अशी शिक्षा गुन्हेगारांना देण्यात यावी अशी मागणी देवेंद्र लांबे यांनी केली़यावेळी गणेश हारदे, बाळासाहेब जाधव, मच्छिंद्र गुंड, रवींद्र मोरे यांची भाषणे झाली़ आंदोलनात डॉ़ संजय म्हसे, अनिल इंगळे, नितीन तनपुरे, नवनाथ आढाव, भागवत मुंगसे, बाळासाहेब शिंदे, राहुल चोथे, सरोजपन तुपे आदी उपस्थित होते़ श्रीरामपुरात राष्ट्रवादीचा मोर्चाश्रीरामपूर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून समाजातील विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे तसेच महिलांना सुरक्षितपणे वावरता येईल, अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने प्रांत कार्यालयावर मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मोर्चात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रा. सुनीता गायकवाड, जि. प. सभापती शरद नवले, सिध्दार्थ मुरकुटे, पंचायत समिती सभापती वंदना राऊत, अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय नाईक, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक खंडागळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.