शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर नाका बनला ‘डेंजर झोन’ !

By admin | Updated: December 26, 2015 00:09 IST

महामार्गावरच बसस्थानक : धोक्याची सूचना मिळूनही दुर्लक्ष

कऱ्हाड/मलकापूर : गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर नाक्यावर मद्यधुंद ट्रकचालकाने उपमार्गावर दहा जणांना जखमी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर कोल्हापूर नाक्यावरील परिस्थिती बदलणे अपेक्षित होते. मात्र, आजही नाक्यावर उपमार्गासह महामार्ग खासगी बसच्या विळख्यात असल्याचे दिसते. बस चालकांनी महामार्गावरच ठिय्या मांडल्याने येथे भीषण दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर नाका परिसर दिवसेंदिवस ‘हिट अ‍ॅन्ड रन’चे ठिकाण बनत आहे. याठिकाणी महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे या ठिकाणी लहान-मोठ्या अपघाताची मालिकाच सुरू आहे. या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी रात्री मद्यधुंद ट्रकचालकाने कोयना वसाहत ते कोल्हापूरनाका परिसरात बेफामपणे ट्रक चालवत चांगलाच धिंगाणा घातला. या अपघातामध्ये पाच वाहनांसह पादचाऱ्यांना धडक देत दहा जणांना जखमी केले. वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती याची प्रचिती या घटनेतून आली. ही घटना घडून केवळ २४ तास ओलांडले नसतानाही पुन्हा दुसऱ्या दिवशी कोल्हापूर नाका खासगी प्रवासी बसने गजबजला. रात्रीच्या वेळी उपमार्गाबरोबरच महामार्गावरही बसच्या धोकादायकरित्या रांगा लागल्या होत्या. त्यावरून एवढी मोठी दुर्घटना घडूनही पोलिसांनीही एका दिवसात या दुर्घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत होते. (प्रतिनिधी) फूटपाथवर हातगाडे व खोकीकोल्हापूर नाका येथील मळाई टॉवर परिसरात फूटपाथवरच काही खोकीधारकांनी व्यवसाय थाटले आहेत. तर हातगाडे व किरकोळ विक्रेत्यांनी उपमार्गाकडेलाच दिवसभर ठाण मांडलेले असते. व्यावसायिक फूटपाथवर तर ग्राहक रस्त्यावर गर्दी करतात. शुक्रवारी रात्री गर्दी नसताना गंभीर घटना घडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अशी अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांनाही गांभीर्य नाही...मद्यधुंद ट्रकचालकाने अंदाधुंंद वाहन चालवत केलेला अपघात सर्वांना माहीत असतानाही कोल्हापूर नाक्यासह ठिकठिकाणी प्रवाशांनीही महामार्गावरच ठिय्या मांडला होता. यावरून बस एजंटासह प्रवाशांनाही आपल्या जिवाची काळजी नाही. किंवा घटनेचे गांभीर्य नाही, अशी परिसरात चर्चा होती. पोलिसांसमोरच महामार्गावरच रांगाकोल्हापूर नाक्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात केलेले असतात. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतरही शनिवारी व रविवारी रात्री पोलिसांसमोरचं राजरोसपणे खासगी बसच्या महामार्गावरच रांगा लागल्या होत्या.