शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

By admin | Updated: December 15, 2015 00:56 IST

शेतकरी संतप्त : अकाईचीवाडीत वीजपंप बंद केल्याने पिके वाळली

उंडाळे : अकाईचीवाडी, ता. कऱ्हाड येथील पिण्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाझर तलाव व तलावानजिकच्या सर्वच खासगी विहिरींवरील शेती पंप बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने खासगी विहिरींवरील शेतकऱ्यांनी एक किंंवा दोन पाण्यासाठी वीज शेतीपंप सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर काटकसरीने करावा व पाझर तलावातील बेकायदेशीर पाणी उपसा बंद करण्याबाबत अकाईचीवाडी ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत. या सूचनेतून पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ठराव करून पाझर तलाव व नजिकच्या खासगी विहिरीतील शेतीपंप तातडीने बंद करण्याबाबत वरिष्ठ कार्यालय, तहसीलदारांना कळविले होते. तहसीलदारांनी तलावातील व तलावानजिकच्या गाव विहिरी वगळता सर्व वीज, शेतीपंप बंद करण्याचा आदेश वीजवितरण कंपनीला दिला. त्यानुसार तलावाजवळील सर्व शेतीपंप बंद करण्यात आले. त्यामुळे हातातोंडाला आलेले उसाचे पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विनंती करून एक किंंवा दोन पाणी देण्यासाठी फक्त तलावानजिकच्या खासगी विहिरींवरील शेतीपंप सुरू करण्याची विनंती केली. पाणी टंचाई लक्षात घेता सर्वच शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, ग्रामपंचायत, तहसीलदार व वीजवितरण कंपनीच्या आडमूठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा ऊस वाळू लागला आहे. ऊसतोडी मिळण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याने अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) माझ्या मालकीच्या खासगी विहिरीवर दोन एकर ऊस असून, माझी विहिर तलावापासून २०० फुटावर आहे, तर गाव विहिरीपासून दोन हजार फुटावर आहे. असे असताना वीजपंप बंद केल्याने माझा संपूर्ण ऊस वाळला आहे. उसाला एक किंवा दोन वेळा पाणी मिळाले असते तर माझे हे नुकसान टळले असते.- लालासाहेब वडकर, शेतकरी