शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पतंग कटली... रिक्षा सुसाट!

By admin | Updated: June 4, 2016 00:32 IST

सत्ताधारी ‘भागधारक’ विजयी : ‘परिवर्तन’चे सर्वच उमेदवार पराभूत

सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये २१-० असा एकतर्फी पराभव करीत सत्ताधारी भागधारक पॅनेलची ‘रिक्षा’ सुसाट धावली, तर विरोधी परिवर्तन पॅनेलची ‘पतंग’ वरच्यावरच कटली. ‘भागधारक’चे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. प्रकाश गवळी, शिरीष चिटणीस, प्रकाश बडेकर, राजन जोशी, रफिक बागवान, दीपक पवार, डॉ. अच्युत गोडबोले या सहा विद्यमान संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तात छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला खुल्या प्रवर्गातील १६ जागांसाठी उभ्या राहिलेल्या ३३ उमेदवारांना पडलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. मोजणीच्या पाच फेऱ्या पार पडल्या. या पाचही फेऱ्यांमध्ये भागधारक पॅनेलच्या सर्वच उमेदवारांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली होती. सर्वसाधारणनंतर महिला राखीवची मोजणी झाली. भागधारक पॅनेलच्या सुजाता राजेमहाडिक व डॉ. चेतना माजगावकर यांनी विजय मिळविला. इतर मागास प्रवर्गातून अशोक मोने यांनी तर भटक्या जमातीमधून बाळासाहेब गोसावी विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विजय बडेकर यांनी विजय मिळविला. भागधारक पॅनेलवर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. बहुचर्चित जनता बँकेच्या निवडणुकीसाठी विनोद कुलकर्णी, अ‍ॅड. मुकुंद सारडा यांच्या नेतृत्वाखालील भागधारक पॅनेल विरुद्ध प्रकाश गवळी, डॉ. अच्युत गोडबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलमध्ये झुंज झाली. गेल्या महिनाभर प्रचाराचा धुरळा उडाला होता. गुरुवारी ५४ टक्के मतदान झाले होते. १९ हजार ७७ मतदारांपैकी १० हजार ९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.