शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

किसन वीर समाज, देशासाठी जगले

By admin | Updated: December 28, 2015 00:51 IST

संभाजीराव पाटणे : भुर्इंज कारखाना कार्यस्थळावर स्मृतिदिन कार्यक्रम

भुर्इंज : ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज आणि देशभक्तीने प्रेरित होऊन थोर स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. ते समाज, देशासाठी जगले म्हणूनच ते महापुरुष ठरले. त्यामुळे त्यांच्यासारखी माणसं ही देशाची सन्मानप्रतीके आहेत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे यांनी केले.किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आबासाहेब वीर यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.प्रा. पाटणे म्हणाले, ‘क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण व तत्कालीन सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करताना किसन वीरांनी आंदोलने, सत्याग्रहे, जेल फोडणे अशा धाडसी कृत्यातून इंग्रजांना हा देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी किसन वीरांनी दिलेले योगदान देशकधीही विसरू शकणार नाही. या वाटचालीत यशवंतराव चव्हाण यांची मोलाची साथ लाभली, पुढे या दोघांमध्ये निर्माण झालेली मैत्रीआणि ऋणानुबंध जिल्ह्यासह राज्याने अनुभवली. त्यांच्यासारखी माणसे ही देशाची सन्मानप्रतीके आहेत,’ असे नमूद करून प्रा. पाटणे यांनी यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या मैत्रीचा आणि स्वातंत्रपूर्व काळातील त्यांच्या कामगिरीचा गौरवाने उल्लेख केला. प्रा. वसंतराव जगताप, संचालक भगवानराव आवडे यांनीही किसन वीर यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला प्रा. संभाजीराव पाटणे यांच्यासह मान्यवरांनी आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. उपाध्यक्ष गजानन बाबरयांनी स्वागत केले. संचालक नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले. गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, प्रताप यादव, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, भगवानराव आवडे, विजया साबळे, आशा फाळके, प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, प्रा. वसंतराव जगताप, शंकरराव पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)