सातारा : रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्सच्यावतीने सक्सेस ॲबॅकसचे सीईओ किरण पाटील व मीनाक्षी पाटील यांचा ‘लोकमत टीचर्स एक्सलेन्स ॲवॉर्ड’ मिळाल्याबद्दल रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे किरण पाटील यांनी आजवर अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी रोटरीतील अनेक पदाधिकारी व सदस्य कुटुंबियांसमवेत यावेळी उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष शेलार यांनी किरण पाटील यांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल मिळाल्याचे सांगितले. किरण पाटील यांनी ‘लोकमत’च्या पुरस्काराने कार्याचा उचित गौरव झाला. रोटरीतील सत्काराने नवी ऊर्जा मिळाली, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरीचे सचिव अमित बेंद्रे, खजिनदार गौरव वखारीया उपस्थित होते.
फोटो ०६ किरण पाटील
सातारा येथे किरण पाटील, मीनाक्षी पाटील यांचा सत्कार रोटरीचे अध्यक्ष नरेंद्र शेलार व सचिव अमित बेंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.