शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राजे, सर्वांना खिशात घेऊन फिरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:14 IST

कºहाड : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी कºहाडच्या विश्रामगृहावर महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रवादी ...

कºहाड : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी कºहाडच्या विश्रामगृहावर महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत सुरू असणाºया कलहाच्या पार्श्वभूमीवर या भेटीची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच ‘राजे, सर्वांना खिशात घेऊन फिरतात,’ असे वक्तव्यही मंत्री पाटील यांनी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.साताºयाचे खासदार म्हणून उदयनराजे भोसले काम पाहतायत; पण जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार यांचे ट्युनिंग जुळत नसल्याचा अनुभव आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदयनराजेंच्या उमेदवारीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांकडे विरोध केल्याची चर्चा आहे. मात्र, उदयनराजे रिंगणात असणार, हे सांगायला जोतिषाची गरज लागणार नाही.दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीत अस्वस्थ असणारे उदयनराजे भाजपमध्ये आले तर स्वागतच असेल, असे उत्तर दिले होते. त्या वक्तव्यानंतर काही काळातच उदयनराजेंनी महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची घेतलेली ही भेट महत्त्वाची तर आहेच; पण त्याबरोबर राजे कुणाला घाबरत नाहीत, सर्वांना खिशात घेऊन फिरतात, अशी चंद्रकांत पाटील यांनी केलेली टिपण्णी चर्चेची आहे.