शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पालकवर्गाच्या थ्रिलिंग गेम ठरतायत चिमुरड्यांसाठी किलिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे, या अट्टहासापायी बोबडे बोल बोलणाºया मुलांचे हात टचस्क्रिनवर लिलया फिरू लागले आहेत. पालकांनाही त्याचे विशेष कौतुक! पालकांचा मोबाईल घेऊन त्यावर अपलोड केलेल्या थ्रिलिंग गेम्स चिमुरड्यांसाठी किलिंग ठरत आहेत. पालकांनी मुलांना स्मार्ट फोन देण्याआधी त्याचा वापर कसा स्मार्टली केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे, या अट्टहासापायी बोबडे बोल बोलणाºया मुलांचे हात टचस्क्रिनवर लिलया फिरू लागले आहेत. पालकांनाही त्याचे विशेष कौतुक! पालकांचा मोबाईल घेऊन त्यावर अपलोड केलेल्या थ्रिलिंग गेम्स चिमुरड्यांसाठी किलिंग ठरत आहेत. पालकांनी मुलांना स्मार्ट फोन देण्याआधी त्याचा वापर कसा स्मार्टली केला पाहिजे, याविषयी स्वत:च धडे घेण्याची वेळ आता आली आहे.कोरेगाव येथील सुभाषनगरमध्ये मुळचे रंगनाथस्वामी निगडी, ता. कोरेगाव येथील महेश जगताप मुंबईला आपल्या कुटुंबासह राहतात. गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते. काही कामानिमित्त त्यांची पत्नी व मुलगी श्रावणी सुभाषनगर येथे दोन दिवस मावशीकडे आली होती. रविवारी सकाळी घरातील सर्वजण कामात असताना श्रावणी मोबाईलवर गेम खेळत होती. श्रावणीला कफ झाला होता. हा कफ श्वसनलिकेत अडकून श्वास कोंडून तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला.कोरेगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांचा मोबाईल वापर आणि त्यावर पालकांचे नियंत्रण हे विषय ऐरणीवर आले आहेत. कित्येकदा पालक खेळत असलेले खेळच मुलंही खेळतात. आपल्यापेक्षा आपली पोरं लई हुश्शार! म्हणत पालकही एक-एक लेव्हल कसे पुढं जायचं हे मुलांसमोर खेळून दाखवतात. त्यामुळे मुलांनाही मोबाईलवर हे गेम खेळण्याचे आकर्षण वाटते. पालकांच्या वयाचे गेम त्यांच्या मुलांनी खेळण्यातील धोके अनेक असतात. बहुतांश पालकांच्या मोबाईलवर हाणामारी आणि युध्दाच्या किंवा मग थ्रिलिंग गेम असतात. हे गेम खेळताना पालक सजग असतात, त्यातील जय-पराजयाची धास्ती पालकांना नसते. म्हणूनच ही गेम खेळताना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढणे, श्वास कोंडून राहणे हे प्रकार होत नाहीत. या उलट प्रत्येक लेव्हलवर यशस्वी होण्याच्या नादात मुलं शब्दश: श्वास घेण्यासही विलंब करतात. मुलांच्या अजाणतेपणात ही नैसर्गिक क्रिया ते रोखून धरतात, हे कित्येकदा पालकांच्याही लक्षात येत नाही. अंतिम टप्प्यातील लेव्हल सुटली की मुलं मोठा श्वास सोडतात, हे त्या मागचे कारण आहे. मात्र, मुलांच्या हातात मोबाईल देऊन कामात व्यस्त असणाºया पालकांच्या हे लक्षात येत नाही. मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना त्याचा वापर स्मार्टली करण्याची सवय लावणं हे पालकांचे कर्तव्य आहे. पण अनेक घरांत मुलं स्वतंत्रपणे मोबाईल हाताळतात, हे भूषणावह समजले जाते.श्वास रोखून थरार...वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलं मोबाईलमधील गेम जिंकण्यासाठी खेळतात म्हणून काहीही झाले तरी जिंकणं हे त्यांचे अंतिम साध्य असते. याउलट मोठी माणसं त्यांचा ताण घालविण्यासाठी गेम खेळतात. त्यामुळे त्यातून निव्वळ करमणूक हा एकच भाग असतो. पण मोठ्यांच्या खेळातील ही मुलभूत चिमुरड्यांना समजत नाही आणि हे त्यांना सांगायची गरज आहे, हे पालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे थ्रिलिंग गेम खेळताना मुलांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके हे सामान्य असत नाहीत.एकाग्रता गेलीएकाकीपणा आला!कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर लहान होऊन प्रयत्न करा, असे म्हटले जाते. पण आजच्या डिजीटल युगात मुलांमधील ही एकाग्रता मोबाईलमुळे संपुष्टात आली आहे. मोबाईल नसेल तर मुलांना एकाकीपणाची भावना येऊ लागली आहे. ‘आई-बाबा तुम्ही बाजारात जाऊन या फक्त आमच्यासाठी मोबाईल ठेवा,’ हे वाक्य अनेक घरांमध्ये ऐकणारे पालक आहेत. भविष्यातील एकलकोंडेपणाची ही सुरुवात तर नसेल ना, याविषयी पालक फारसे गंभीर असत नाहीत.मुलांसाठी विशेष खेळ...इंटरनेटवर मुलांची कल्पकता वाढविण्याबरोबरच त्यांच्यातील अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी खूप गेम्स आहेत. पण पालकांच्या मोबाईलवर त्यांच्याच पसंतीच्या गेम्स अपलोड केल्या जातात. त्यामुळे मुलांना आपल्या आवडीचेही गेम्स आहेत, हे कित्येकदा मित्र-मैत्रिणींकडून समजते. आजच्या युगात मुलांना आधुनिक ठेवायचं असेल तर त्यांच्या वयाच्या विश्वात जाऊन त्यातून त्यांच्यासाठी आवश्यक गेम्स शोधले पाहिजेत.लाड का लक्ष..!अनेक घरांमध्ये आजी-आजोबांनी नातवंडांचे काय हट्ट पुरवायचे आणि किती पुरवायचे याचा निर्णय मुलांचे आई-बाबा घेतात. नातवंडांची कोणतीही इच्छा पूर्ण केली की, त्याला आजी-आजोबांचे लाड असा टॅग लावून पालक रिकामे होतात. पण नातवंडांच्या वयात जाऊन त्यांच्याशी मैत्री करण्या इतपत वेळ आता केवळ त्यांच्याकडेच आहे. म्हणूनच त्याला लाड म्हणण्यापेक्षा ‘लक्ष’ म्हणणे कदाचित योग्य ठरेल. आजच्या जगात रहायचे असेल तर मुलांना सगळं दिलंच पाहिजे, या मानसिकतेत असलेले पालक मुलांचे जे अतिलाड करतात, त्याला पालकांचे ‘दुर्लक्ष’ म्हणावे लागेल. मुलांना भौतिक साधने देण्यापेक्षा त्यांना गुणात्मक वेळ देणं आता गरजेचे असल्याचे मत डॉ. उदयराज फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.