शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळजवळ युवक ठार

By admin | Updated: January 29, 2015 00:13 IST

दुचाकीचा अपघात : महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यासह दोघेजण जखमी

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत शिर्के कंपनीसमोर दुचाकीचा ताबा सुटल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक बसली. या अपघातात मोटारसायकलचालक ठार तर पादचाऱ्यासह अन्य एकजण जखमी झाला आहे. आशिष हिंदुराव खैरे (वय ३५, रा. खमलेहट्टी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे या ठिकाणी एक खासगी कंपनीत कामाला असणारे आशिष खैरे हे आपल्या गावातील मित्र व पुणे या ठिकाणी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे संजय कुरळे यांच्यासमवेत गावावरून पुणेला जाण्यासाठी मोटारसायकलवरून (एमएच १२ केएम १८३५) निघाले होते. दरम्यान, मोटारसायकल पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शिर्के कंपनीसमोर आली. त्यावेळी मोटारसायकल भरधावपणे चालली होती. यादरम्यान दुचाकीवरील ताबा सुटल्याने राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारा पादचारी रविंद्र दत्तात्रय मगर (वय २६ रा. शिरवळ, ता. खंडाळा) याला धडक बसली. दुचाकीच्या या अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी असणाऱ्या आशिष खैरे यांना शिरवळ येथीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, आशिष खैरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाणे अंकित शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे. दूरक्षेत्राचे सहायक फौजदार रफिक पटेल हे अधिक तपास करीत आहेत, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)