शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

By admin | Updated: March 13, 2017 23:09 IST

अभयचीवाडीतील घटना; सहा दिवसांपासून तरुण गायब; पत्नीची फिर्याद, दोघांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचे अपहरण केले. याबाबत अपहृत तरुणाच्या पत्नीने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पुण्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय बळवंत सुर्वे (वय २८, रा. अभयचीवाडी, ता. कऱ्हाड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयचीवाडी येथील संजय सुर्वे हा तरुण शेती करतो. ८ मार्चला संजय व त्याची पत्नी पूनम हे दोघे घरी असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरी आले. संजय त्या दोघांनाही ओळखत होता. त्याने त्या दोघांना घरामध्ये घेऊन पत्नी पूनम हिला चहा बनविण्यास सांगितला. पूनम चहा घेऊन आल्यानंतर संजयने त्या दोघांची ओळख करून दिली. एकाचे नाव ऋषिकेश भंडारी, तर दुसऱ्याचे नाव सागर असल्याचे संजयने पूनमला सांगितले. चहा दिल्यानंतर पूनम घरात गेली. काही वेळानंतर त्या दोघांनी संजयला ‘आम्हाला स्टॅण्डवर सोडून ये,’ असे सांगितले. त्यानुसार संजय त्याची दुचाकी (एमएच ५० वाय ३४४) घेऊन त्या दोघांसमवेत घरातून बाहेर पडला. ‘या दोघांना स्टॅण्डवर सोडून मी लगेच परत येतो,’ असे त्याने पूनमला सांगितले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे पूनमने त्याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तो बंद होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूनमने संजयची विवाहित बहीण सुलोचना यांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. ‘त्यावर आपण उद्यापर्यंत वाट बघू,’ असे सुलोचना यांनी पूनमला सुचविले. त्यामुळे पूनम जेवण करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संजयची बहीण अभयचीवाडी येथे आली. संजयच्या मोबाईलवरून कोणी तरी माझ्या मोबाईलवर फोन केला होता. ‘पाच लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा नाहीतर तुम्हाला जड जाईल. तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे,’ अशी त्या व्यक्तीने मला धमकी दिल्याचे सुलोचना यांनी पूनमला सांगितले. तसेच त्या व्यक्तीने ‘संजय व आम्ही पुण्यात आहे,’ असेही सुलोचना यांना सांगितले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पूनमने पुन्हा संजयच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तेव्हाही फोन बंद होता. दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पूनमला संजयच्या मोबाईलवरून अज्ञाताने फोन केला. ‘सात लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा. नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतील,’ अशी धमकी देऊन त्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यानंतर पूनमने दोन दिवस संजयची वाट पाहिली. मात्र, तो घरी परत न आल्याने व त्याच्याशी संपर्कही न झाल्याने पत्नी पूनम हिने सोमवारी याबाबत कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली.