शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

By admin | Updated: March 13, 2017 23:27 IST

अभयचीवाडीतील घटना; सहा दिवसांपासून तरुण गायब; पत्नीची फिर्याद, दोघांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचे अपहरण केले. याबाबत अपहृत तरुणाच्या पत्नीने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पुण्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय बळवंत सुर्वे (वय २८, रा. अभयचीवाडी, ता. कऱ्हाड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयचीवाडी येथील संजय सुर्वे हा तरुण शेती करतो. ८ मार्चला संजय व त्याची पत्नी पूनम हे दोघे घरी असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरी आले. संजय त्या दोघांनाही ओळखत होता. त्याने त्या दोघांना घरामध्ये घेऊन पत्नी पूनम हिला चहा बनविण्यास सांगितला. पूनम चहा घेऊन आल्यानंतर संजयने त्या दोघांची ओळख करून दिली. एकाचे नाव ऋषिकेश भंडारी, तर दुसऱ्याचे नाव सागर असल्याचे संजयने पूनमला सांगितले. चहा दिल्यानंतर पूनम घरात गेली. काही वेळानंतर त्या दोघांनी संजयला ‘आम्हाला स्टॅण्डवर सोडून ये,’ असे सांगितले. त्यानुसार संजय त्याची दुचाकी (एमएच ५० वाय ३४४) घेऊन त्या दोघांसमवेत घरातून बाहेर पडला. ‘या दोघांना स्टॅण्डवर सोडून मी लगेच परत येतो,’ असे त्याने पूनमला सांगितले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे पूनमने त्याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तो बंद होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूनमने संजयची विवाहित बहीण सुलोचना यांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. ‘त्यावर आपण उद्यापर्यंत वाट बघू,’ असे सुलोचना यांनी पूनमला सुचविले. त्यामुळे पूनम जेवण करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संजयची बहीण अभयचीवाडी येथे आली. संजयच्या मोबाईलवरून कोणी तरी माझ्या मोबाईलवर फोन केला होता. ‘पाच लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा नाहीतर तुम्हाला जड जाईल. तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे,’ अशी त्या व्यक्तीने मला धमकी दिल्याचे