शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सल्या चेप्याच्या मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 00:23 IST

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : बबलू मानेच्या खुनाच्या कटात सहभाग

कऱ्हाड : बबलू मानेच्या खूनप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या मुलाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. असिफ सलीम शेख (वय २३, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) असे त्याचे नाव आहे. बबलूच्या खुनाच्या कटात असिफचा क्रियाशील सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. शहरातील मंगळवार पेठेत २० जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास बबलू माने याच्यावर बाबर खानने गोळ्या झाडून त्याचा खून केला. तर खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाबरला जमावाने दगडाने ठेचून ठार मारले. या टोळीयुद्धामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. तर बबलूच्या खूनप्रकरणी सहाजण अटकेत आहेत. शहरातील टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरात अचानक छापासत्र चालविले. पोलिसांनी सल्या चेप्याच्या घरासह आठ घरांवर छापे टाकले. त्यामध्ये पोलिसांनी महत्त्वाच्या कागदपत्रांसह संपूर्ण घरांची झडती घेतली. या झडतीत सल्याच्या घरात पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे आढळून आली होती. त्यामुळे शस्त्रास्त्र कायद्यान्वये पोलिसांनी सल्या चेप्या याच्यासह त्याची पत्नी शहनाज हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. सध्या शहनाज न्यायालयीन कोठडीत आहे. बबलू मानेच्या खून प्रकरणात यापूर्वी अटकेत असलेल्या फिरोज कागदी, मोहसिन जमादार, इब्राहिम सय्यद, जावेद शेख व इरफान इनामदार या पाचजणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी बबलूच्या खुनाच्या कटात सल्या चेप्याचा मुलगा असिफ याचाही क्रियाशील सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी असिफला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.  बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सागर चंद्रकांत माने (वय २५), हृषीकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) व विशाल हिंदुराव कांबळे (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) या तिघांना अटक केली आहे. शुक्रवारी आणखी दोघांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. अक्षय सुनील शेंद्रे (२०), विक्रम ऊर्फ अक्षय विश्वास शिंदे (२८, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)सांगलीत दुचाकी जप्तबबलू मानेवर गोळ्या झाडण्यासाठी गेलेल्या बाबर खानसोबत फिरोज कागदी होता, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. फिरोज दुचाकी रायडर होता. बबलूच्या खुनानंतर तो तेथून पळून जाण्यासाठी बाबरला मदत करणार होता. मात्र, जमावाने बबलूला ठेचून मारल्याचे दिसताच घाबरून फिरोज तेथून पळून गेला. फिरोजने वापरलेली दुचाकी पोलिसांनी सांगलीतून हस्तगत केली आहे.