शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात दाटला शास्त्रीय संगीताचा गारवा

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

प्रीतिसंगम संगीत महोत्सव : पंडित व्यंकटेश कुमारांच्या स्वरांनी सजली रौप्यमहोत्सवी मैफल

कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रौप्यमहोत्सवी संगीत महोत्सवाची मैफिल सोमवारी सजली़ ख्यातनाम पंडित व्यंकटेशकुमार यांच्या चढत्या सुरेल स्वरांनी रसिकमनावर गारूड केले़ त्यांनी लिलया सादर केलेल्या रागदारीने कऱ्हाडकर रसिक चिंब न्हाऊन गेले़ सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कऱ्हाड शहरात कऱ्हाड जिमखान्याने प्रीतिसंगम संगित महोत्सवाचे आयोजन केले आहे़ त्याचे उद्घाटन ग्वल्हेरच्या किराणा घराण्याचे गायक पंडित एम़ व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष सुधिर एकांडे, सचिव डॉ़ मिलिंद पेंढारकर, चंद्रशेखर देशपांडे, अनिल शहा, विवेक ढापरे, चंद्रकांत जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती़ पंडित व्यंकटेशकुमार यांनी ‘यमन’ रागाच्या तारा छेडत मैफिलीचा प्रारंभ केला़ अन् ‘सखी येरी आली पियाबीन’ ही चिज त्यांनी खुलवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले़ त्यांनंतर दुर्गा रागातील ‘सखी मोरी रूमझुम’, ‘भाग मोरी येरी धन धन’ या दोन चिज छोट्याछोट्या बारकाव्यांसहीत उलगडून दाखविल्या़ दिवंगत वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या ‘आशा निराशा’ या नाटकातील ‘अविरत सलाम घ्यावा देवा’,‘मजगाली कलिका लावी देवा’ हे मिश्र मांड रागातील नाट्यगित उपस्थितांना अतिशय भावले़ ‘राजन के राज श्री रामचंद्र उद्दार’ ही कौशिक कानडा रागातील बंदिश पेश करत व्यंकटेशकुमारांनी रसिकांची वाहवा मिळविली़ याच रागातील ‘काय करत मुझे भर जोगी’ ही चिज सादर करताना त्यांनी त्यावर स्वरवर्षावच केला़ शेवटी ‘समझा मन कोई नही अपना’ या तरल भैरवीचे स्वरशिंपण करत त्यांनी मैफिलीला स्वरविराम दिला़ आपल्या खड्या आणि पहाडी आवाजाने सादर केलेल्या एकामागून एक चिज ऐकल्यावर कऱ्हाडकरांनी व्यंकटेशकुमार यांची स्वरावरील मदार अनुभवली़ पंडित रविंद्र कोतोटी यांनी संवादिनी, अविनाश पाटील यांनी तबला, प्रमोद किरपेकर व शिवराज पाटील यांनी तानपुऱ्यावर साथ केली़ रसिकांनी याला भरभरून दाद दिली. (प्रतिनिधी)मैदानावरील खेळाडू संगिताच्या मैफिलीत खरंतर कऱ्हाड जिमाखान्याची ओळख क्रीडा क्षेत्रातील काम करणारी संस्था अशीच आहे़ परंतू संगित क्षेत्राची आवड असणाऱ्या अबालवृध्दांची सेवा करण्याच्या उद्देशाने कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातही ते सक्रीय दिसत आहेत़ म्हणूनच संगीत महोत्सवच्या निमित्ताने मैदानावरचे खेळाडू आज संगीताच्या मैफिलीत दिसत होते़