शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

खुले आरक्षण असल्याने खुल जा सिमसिम...

By admin | Updated: October 7, 2016 00:15 IST

इच्छुकांची मांदियाळी : मातब्बर नशीब आजमविणार

साहील शहा -- कोरेगावकोरेगाव : जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या कोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारणसाठी खुले राहिल्याने अनेक इच्छुकांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिले नगराध्यक्षपद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आजवर विविध पदे भूषविणारी मातब्बर नेतेमंडळी नशीब आजमविण्याची शक्यता आहे. नवनिर्मित कोरेगाव नगरपंचायतीची प्रभाग रचना व त्यावरील आरक्षणे जाहीर झाल्यानंतर १७ पैकी ९ महिला नगरपंचायतीत दिसणार असून, पाच जागा सर्वसाधारणसाठी राहिल्या आहेत. तीन जागा आरक्षित झालेल्या आहेत. प्रभाग क्र. ४, ८, ९, ११ व १३ हे सर्वसाधारणसाठी खुले झाले आहेत. प्रभाग क्र. २, ३, ५, ६, ७ हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत. प्रभाग क्र. १ व १५ हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाले असून, प्रभाग क्र. १२, १४ व १६ हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभाग क्र. १० हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला असून, प्रभाग क्र. १७ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे. नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले नाही. विविध पदे भूषविलेले पदाधिकारी अजून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेताना दिसत होते. आरक्षण सोडतीसाठी नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यांच्या नावांची झाली चर्चा सुरू...कोरेगावमध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, माजी सरपंच अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, प्रतिभा बर्गे, दिनेश बर्गे, युवराज बर्गे, धनंजय बर्गे, राजाभाऊ बर्गे, संजय पिसाळ, राहुल रघुनाथ बर्गे, सचिन बर्गे, दिलीप बर्गे, संजय पाटील, महेश बर्गे, सुनीलदादा बर्गे, अभिजित केंजळे, किशोर बर्गे, नितीन ओसवाल, हणमंतराव पवार यांच्यासह आजी-माजी सदस्य निवडणूक लढविणार.