या स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास संतोष जाधव यांच्याकडून ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकास विठ्ठल जाधव यांच्याकडून ७ हजार ७७७ रुपये, तृतीय क्रमांकास सुभाष जाधव यांच्याकडून ५ हजार ५५५ रुपये तर चतुर्थ क्रमांकास संजय जाधव यांच्याकडून ३ हजार ३३३ रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. तर मंडळाच्या खेळाडूंसाठी स्वराज फार्मस, युवराज जाधव, मावलाई देवी सप्लायर्स, संतोष जाधव यांच्याकडून कीट दिली जाणार आहेत. सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, तहसीलदार अमरदीप वाकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक प्रवीण जाधव, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
खराडेत शनिवारी खुल्या गटातील खो-खो स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST