शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्याचा झाला खेळखंडोबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

सातारा : राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या गलथान कारभारामुळे गावगाड्याचा खेळखंडोबा झाला आहे. चुकीच्या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सरपंच ...

सातारा : राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या गलथान कारभारामुळे गावगाड्याचा खेळखंडोबा झाला आहे. चुकीच्या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सरपंच पद रिक्त राहिलेले आहे. याचा त्रास सर्वांनाच होत असून प्रत्येक विकास कामांवर याचा विपरीत परिणाम होणार असल्याची टीका होऊ लागलेली आहे.

गेल्या वर्षभरात ग्रामविकास विभागाने अतिशय चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये लोकनियुक्त सरपंच बंद करून जुन्या पध्दतीने सदस्यातून निवड सुरू केली तसेच ग्रामसभेने या सरपंचास अविश्वास ठराव संमत करायचा कायदा असताना एक परिपत्रक काढून सदस्यांतून मंजूर करण्याचे अधिकार केले ही कायदा विरोधी चूक केली नंतर अंगलट आले की दुरुस्ती केली, नंतर ग्रामपंचायत निवडणूक लागली. त्यामध्ये आरक्षणची आठ जिल्ह्यातील सोडत केली व इतर जिल्ह्यातील निवडणूक नंतर असे जाहीर केले. यावर सरपंच परिषदेने आवाज उठवला की सर्व आरक्षण रद्द केली, अशी घोषणा केली. आता निवडणूक झाली की जे निवडणूक पूर्वी आरक्षण होते, ते कायम राहणार असे पत्र काढले. उर्वरित जिल्ह्यातील आरक्षण सोडत केली; परंतु त्यामध्ये ही चूक केली अगोदर घोषणा केली होती की निवडणुकीनंतर आरक्षण पण ज्यांच्या निवडणुका अजून दोन वर्षांनी आहेत त्यांचीही आरक्षण सोडत केली म्हणजे या ग्रामपंचायतींचे निवडणूक पूर्व आरक्षण घोषित केले.

ज्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या त्या ठिकाणी ते आरक्षणच नाही. उदाहरणार्थ जिथे महिला मागासवर्गीय आहे, त्या ठिकाणी मागासवर्गीय पुरुष सदस्य आहे; पण महिला आरक्षण असल्याने ती जागा रिक्त राहिली म्हणजेच ते गाव सरपंच पदापासून रिक्त राहिले व त्या समाजाच्या महिलांवर अन्याय झाला, असे कितीतरी निर्णय ग्रामविकास विभागाने चुकीचे केलेले आहेत.

त्याचा नाहक त्रास राज्यातील गावांना व लोकांना होत आहे याचा अर्थ असा होतो की, या विभागातील अधिकारी यांना ग्रामपंचायत कारभार अवगत नसावा. याचा विचार ग्रामविकास मंत्री यांनी त्वरित करावा याची चर्चा गावपातळीवर होत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

कोट

ग्रामविकास विभागाने या भोंगळ कारभाराला लगाम घालावा अन्यथा सरपंच परिषद आंदोलन अथवा याचिका दाखल करण्याच्या विचाराधीन आहे.

- जितेंद्र भोसले, अध्यक्ष, सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र