शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिनी दुष्काळग्रस्तांना खाऊचा वाटा!

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

‘अभिनव’ उपक्रम : ‘लोकमत बालविकास मंच’चा सदस्य बोभाटेने दिले पैसे -- गूड न्यूज

जगदीश कोष्टी --- सातारा ‘दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा,’ अशी चळवळ ‘लोकमत’ सुरू करताच अनेकजण या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढे आहेत. साताऱ्यातील अभिनव बोभाटे या चौथीतील मुलाने खारीचा वाटा उचलला आहे. अभिनवने वाढदिवसाला खाऊसाठी म्हणून आलेली रक्कम दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. ही रक्कम निवासी जिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्याकडे प्रदान केली.‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेणाऱ्यांने घेता-घेता देणाऱ्याचे हात घ्यावे,’ असं म्हटलं जातं. निसर्गाची चक्र फिरल्यामुळे राज्यावर बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमायला लागले आहेत. त्यामुळे अन्नदाता अडचणीत आला आहे. पाऊस पडेल, या आशेवर त्याने पेरण्याही केल्या; मात्र पावसाअभावी पेरण्या वाया गेल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीसाठी ‘बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर’ ही मोहीम सुरू केली. शेकडो गणेश मंडळे पुढे सरसावली आहेत. डॉल्बीसह इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मदत केली आहे. याच संस्कारातून घडलेला साताऱ्यातील अभिनव बोभाटे या मुलाने वाढदिवसाला खाऊसाठी आलेला पैसादुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. अभिनव हा साताऱ्यातील प्राथमिक सैनिक स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे. मंगळवार, दि. १ सप्टेंबरला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करत असताना शेजार-पाजारचे, नातेवाईक खाऊसाठी पैसे देत होते. हे पैसे अभिनवने न खर्च करता दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. चिमुकल्याचा हा हट्ट पूर्ण करत अभिनवला घेऊन त्याचे आई-वडील दोघेही बुधवार, दि. १६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी येताना पाचशे रुपयांचा धनादेश व एक पत्र आणले होते. पाचशे रुपयांचा धनादेश निवासी जिल्हाधिकारी संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. तेथून बाहेर आल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. ‘लोकमत’कडून प्रेरणा--अभिनव बोभाटे याचे वडील बापूसाहेब हे ग्रामसेवक असून ते अपंग साहित्य संमेलन भरवत असतात. अभिनव हा ‘लोकमत’चा वाचक असून तो बालविकास मंचचा सदस्य आहे. ‘लोकमत’ने सुरु केलेल्या मोहिमेमुळे पेरित झालेल्या अभिनवने वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. कपडे, केक, मित्रांना पार्टी देण्यासाठी केला जात असलेल्या खर्चात कपात करुन पाचशे रुपयांची मदत दुष्काळग्रस्तांसाठी दिली आहे.अभिनव बोभाटे हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने दिलेली मदत लाख मोलाची आहे. वाढदिवसाला जमा झालेली रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी, असं वाटणंच महत्त्वाचे आहे. - संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी