शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खारीक कवडीमोल दरात

By admin | Updated: July 10, 2015 22:14 IST

गावोगावी फिरून विक्री : उत्पादन वाढल्याचा परिणाम; कऱ्हाड तालुक्यात ट्रक दाखल

कोपर्डे हवेली : महागडी मिळणारी खारीक राजस्थानमध्ये अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे गावोगावी कवडीमोल दराने विकली जात आहे. राजस्थानमधील काही किरकोळ व्यापारी खारीकचे ट्रक भरून कऱ्हाड तालुक्यात दाखल झाले आहेत. हे व्यापारी गावोगावी फिरून खारीकची विक्री करीत आहेत. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.खारीक महागडी असल्याने खरेदी करणाऱ्यांची संख्या मर्यादित असते. बारा महिने बाजारपेठेत खारीक उपलब्ध असते; पण किंमत जास्त असल्याने अनेकजण खारीक खरेदी करण्याचे टाळतात. खारीक पौष्टीक असल्याने खुराक म्हणूनही त्याचा वापर होतो. लहान मुलांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना खारीक खायला दिली जाते. तसेच उपवासाच्या कालावधीत श्रावण महिन्यामध्ये खारीक जास्त दराने विकली जाते. त्यावेळी मागणीही जास्त असल्याने विक्रेते त्याचा फायदा घेत खारीकचा दर वाढवतात. मात्र, तरीही ती हमखास खरेदी केली जाते. एरव्हीही खारकेचे दर कायमच जास्त राहिलेले आहेत. ८० रूपयांपासून १२० रूपयांपर्यंत खारकेचा किलोचा दर असतो. राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये खारीकचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी संबंधित राज्यामध्ये खारीकचे उत्पादन जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजस्थानातून खारीकचे ट्रक घेऊन व्यापारी सध्या कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. कऱ्हाडात आल्यानंतर हे व्यापारी लहान वाहनातून गावोगावी फिरत आहेत. या व्यापाऱ्यांनी खारीकच्या एक किलोच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग बनविले आहे. किलोचा दर ५० रूपये त्यांच्याकडून सांगितला जातो. मात्र काहीवेळेस ४० रूपयांनी विक्रेते घेवून त्याची विक्री करत आहेत. मसूर, उंब्रज, कोपर्डे हवेली परिसरात खारीकची विक्री लहान टेम्पोतून होत आहे. गावात असा टेम्पो दाखल होताच ग्राहक खरेदी करीत आहेत. (वार्ताहर)रमजानमुळे मागणी...मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. या उपवासादरम्यान मुस्लिम बांधव खारीक खातात. त्यामुळे खारीकला या महिन्यात चांगली मागणी असते. सध्या गावोगावी खारीक कमी किंमतीत मिळत असल्याने त्याला मागणी वाढली आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या या उपवासाची सांगता रमजान ईदला होत असते. यादिवशी प्रत्येक कुटूंबात शिरर्खुरमा बनविला जातो. हा शिरर्खुरमा बनविण्यासाठीही खारीकचा वापर केला जातो.