शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात

By admin | Updated: July 25, 2016 23:42 IST

वाई तालुका : अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग; सोयाबीन, मूग, चवळी, भुईमूग, हळद पिकांना दिलासा

पसरणी : वाई तालुक्यात उशिरा पावसाने जरी सुरुवात केली असली तरीही या तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोडी जोखीम घेतल्याने व धूळफेक पेरणी केल्याने आज पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या खरीप हंगाम चांगलाच जोमात आहे शेतीची अंतर्गत मशागत चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. निसर्गाने साथ न दिल्यास व थोड्या दिवासांत पाऊस पडला नाहीतर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या अंतर्गत मशागत चालू आहे. पाऊस वेळेत न पडल्यास हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या जरी पावसाने साथ दिली असली तरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा तालुका आजही आहे. तालुक्यातील धरणांची पातळी आजही खालावलेली आहे. पावसाचे काही महिने बाकी असले तरीही तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कृषी विभागानेही पुढचे पाऊल टाकत पिकांचा विमा उतरविण्याचा आग्रह शेतकऱ्यांकडे केला आहे. त्यावर बळीराजाने सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात सोयाबीन, हिरवा मूग, चवळी, भुईमूग, बाजरी, हळद, ऊस या सर्व पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधान पीक विमा योजना सुरू२०१६ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असून, या योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना हा विमा उतरवणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.