शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा न्यायालयाची दोघांना शिक्षा

By admin | Updated: February 15, 2017 23:27 IST

जीपचालकाला सहा महिने साधी कैद; महिलेवर वार केल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी

शिरवळ : पाडेगाव या ठिकाणी जीपने दुचाकीवरील एकाला गंभीर जखमी करीत पलायन केल्याप्रकरणी जीपचालकाला सहा महिने साधी कैद व साडेतीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दुसऱ्या प्रकरणात शेतजमिनीच्या वादातून महिलेवर धारदार ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका युवकाला दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने सुनावली आहे. जीपचालक अमोल ऊर्फ विकास श्रीरंग पाटोळे (वय २८, रा. थोपटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) व उमेश जयवंत यादव (२७, रा. पारगाव-खंडाळा, ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या युवकांचे नाव आहे.याबाबतची माहिती अशी की, लोणंदजवळील पाडेगाव हद्दीतील नीरा-लोणंद रोडवर दि. १२ मे २०१२ ला अमोल ऊर्फ विकास पाटोळे या जीपचालकाने (एमएच ४२ एच ४२६९) विरुद्ध दिशेला रस्त्यावरून निघालेल्या दुचाकीला (एमएच ११ एक्स १५९२) जोरदार धडक देत दुचाकीचालक चंद्रगुप्त तानाजी पवार (२६, रा. पिंपरे, ता. खंडाळा) याला गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणाचा तपास करीत लोणंदचे पोलिस हवालदार सतीश शिंदे यांनी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले. यावेळी सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या न्यायाधीश ए. पी. दिवाण यांनी जीपचालक अमोल ऊर्फ विकास पाटोळे याला दोषी ठरविले. यावेळी दोषी ठरविलेल्या अमोल पाटोळे याला न्यायालयाने सहा महिने कैद व साडेतीन हजार रुपये दंड सुनावला. दुसऱ्या प्रकरणात खंडाळा येथे शेतजमिनीच्या वादातून ९ जून २०१२ ला घरात घुसून महिलेवर धारदार ब्लेडने वार करीत शीला दत्तात्रय यादव यांना उमेश जयवंत यादव याने गंभीर जखमी केले होते. यावेळी या घटनेचा सहायक पोलिस उपनिरीक्षक महादेव अनपट यांनी तपास करीत खंडाळा न्यायालयामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्र्रकांत निकम यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. यावेळी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत याप्रकरणी उमेश यादव याला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरविले. यावेळी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे सहदिवाणी न्यायाधीश डी. एम. गिरी यांनी दोषी ठरविलेल्या उमेश यादव याला दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांना प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश नलावडे, पोलिस हवालदार सुनील गायकवाड, पोलिस हवालदार रवींद्र कदम यांनी मदत केली. (प्रतिनिधी)