शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खामजाई मंदिर, खामटाके नामशेष होणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

खंबाटकी घाट रुंदीकरण : ऐतिहासिक ठेवा वाचविण्याची ग्रामस्थांची मागणी

खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे-सातारादरम्यान खंबाटकी घाटाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या घाटातील ऐतिहासिक खामजाई मंदिर आणि ‘खामटाके’ हा पाण्याचा नैसर्गिक झरा नामशेष होणार असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणाहून शिवकालीन राजमार्ग असल्यामुळे घाटाच्या रुंदीकरणावेळी हा ऐतिहासिक ठेवा वाचविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे खंबाटकी घाटरस्त्याचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे. घाटाच्या मध्यभागी रस्त्यालगत असलेले खामजाई देवीचे मंदिर आणि खामटाके काढण्यात येणार आहे. याबाबतची लेखी सूचना भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचे पुजारी संजय गोसावी यांना दिली आहे. वास्तविक, शिवकालापासूनच खंडाळा हे गाव घाटाच्या पायथ्याशी होते. तेव्हापासूनच हे खामजाई देवीचे मंदिर आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी मोठे टाके खोदण्यात आले होते. त्याला ‘खामटाके’ असे संबोधण्यात येते. वर्षभर या टाक्यातून थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होते. परंतु रस्ता रुंदीकरणाची कुऱ्हाड मंदिरावर आणि ऐतिहासिक वास्तूवर कोसळणार आहे. त्यामुळे गेल्या साडेचारशे वर्षांपासून जपलेला हा ठेवा नष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून खंत व्यक्त केली जात आहे. घाटरस्त्याच्या रुंदीकरणावेळी या वास्तूचा विचार व्हावा, ही मागणी जोर धरू लागली आहे.खंबाटकी घाट आणि खामटाके यांचा जवळचा संबंध आहे. ‘खामटाके’ नावाच्या पाण्याच्या साठ्यावरूनच या घाटाचा नामोल्लेख ‘खामटकी घाट’ व पुढे ‘खंबाटकी घाट’ असा होऊ लागला. त्यामुळे या घाटाच्या नावाचा ऐतिहासिक पुरावाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, घाटातून प्रवास करताना लोकांना थांबण्याचे एक ठिकाणही नाहिसे होणार आहे. त्यामुळे या नोटिशीनंतर होणाऱ्या सर्वेक्षणात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)‘खामटाके’ हा ऐतिहासिक पुरावा आहे. शिवकालीन राजमार्गही येथूनच जात होता. त्यामुळे हा अनमोल ठेवा जपण्यात यावा; अन्यथा शिवप्रेमींना तीव्र भूमिका घ्यावी लागेल.- शेखर खंडागळे, इतिहासप्रेमीखामजाई देवीचे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे. खंडाळा ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे. गावाच्या वतीने देवीचा उत्सवही होतो. घाटाच्या रुंदीकरणात मंदिराला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. ग्रामस्थांच्या भावना जपल्या जाव्यात यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.- किरण खंडागळे, सरपंच, खंडाळा