शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’नं वाजविला ‘डॉल्बीचा बँडबाजा’!

By admin | Updated: August 9, 2016 23:55 IST

पोलिस मोजणार ध्वनीतीव्रता : नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार; जिल्ह्यात सर्वत्र राहणार पोलिसांचा ‘वॉच’

सातारा : गणेशोत्सवात डॉल्बी वाजविल्याने होत असलेल्या ध्वनीप्रदूषणासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आवाज गावाचा, नाय डॉल्बीचा’ ही चळवळ उभारली होती. याला लोकांनी पाठिंबा दिल्याने ती ‘लोकचळवळ’ बनली. याच्या कडक अंमलबजावणीसाठी सातारकरांचे पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी यंदा ‘डॉल्बी’चा बॅण्डबाजा वाजविण्याचा निर्धार केला आहे. फलटणमध्ये तर यापूर्वीच कारवाई करून भूमिका सिद्ध करून दाखविली आहे. (प्रतिनिधी)दणदणाट करणाऱ्या मंडळांवर कारवाई!कऱ्हाड : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकाचा होणारा अतीवापर नवीन नाही; पण डॉल्बीची थापी रचून दणदणाट करणाऱ्या मंडळांची संख्या सध्या भलतीच वाढली आहे. हा दणदणाट रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न झालेत. मात्र, तरीही काही अतीउत्साही कार्यकर्त्यांना समज आलेली नाही. त्यामुळे यावर्षीही पोलिस दलाने कडक धोरण अवलंबले असून ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतलाय.गणेशोत्सव कालावधीत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जातात. ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र, सध्या बंदोबस्ताबरोबरच पोलिसांना मंडळांच्या ध्वनीतीव्रतेवरही लक्ष केंद्रित करावे लागत आहे. मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदरच पोलिसांकडून हालचाली केल्या जात आहेत. शांतता समिती, गुन्हे नियंत्रण समिती तसेच गणराया अ‍ॅवॉर्ड समितीची बैठक घेतली जात आहे. त्या बैठकीत ध्वनी मर्यादेबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तसेच सर्व संघटना, गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना त्याबाबत सूचनाही केल्या गेल्या आहेत. मात्र, एवढे करूनही अनेकवेळा मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले जाते. न्यायालयाच्या निर्देशानुसार क्षेत्रनिहाय ध्वनीमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास यापूर्वी पोलिसांकडून संबंधित मंडळाला समज देण्यात येत होती. कधीकधी दंडात्मक कारवाईही व्हायची; पण तरीही ध्वनी तीव्रतेबाबत मंडळांकडून योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सध्या पोलिसांनी कडक धोरण अवलंबले आहे. (प्रतिनिधी)