दत्ता यादव - सातारा -शहरात तब्बल ४९९ अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे असल्याची धक्कादायक महिती माहिती अधिकार कायद्याखाली उघडकीस आली. यामध्ये विशेषत: सत्ताधाऱ्यांच्या सलगीतील लोकांची ही बांधकामे असून, या बांधकांमाना खादी मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे.शहरामध्ये अनेक बांधकामे केवळ पालिकेची कागदोपत्री परवानगी घेण्यापुरतीच बांधण्यात आली आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम करण्यात आली आहेत. पालिकेतून परवानगी घेताना अटी व नियम पाळण्याची हमी देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र बांधकाम करताना इमारतीचे पार्किंग, दुकानगाळे, बेसमेंटचा कसलाही नियम पाळण्यात आला नाही. काही लोकांनी पालिकेची परवागनी घेताना बेसमेंटचा वापर केवळ स्टोअररूम म्हणून करण्याचे मान्य केले होते. मात्र, बेसमेंटला चक्क हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.अतिक्रमणावर वारंवार आवाज उठवणारे चंद्रशेखर चोरगे आणि अतिक्रमण केल्याचा ठपका असणारे नगरसेवक अशोक मोने यांचाही पालिकेच्या अतिक्रमण यादीत समावेश आहे. नगरसेवकांचा अवैध बांधकाम आणि अतिक्रमणामध्ये प्रत्यक्षात सहभाग नसला तरी त्यांच्या वॉर्डमध्ये अनेक अशी अवैध बांधकामे असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेने नोटिसा धाडल्या आहेत. परंतु केवळ दंड भरण्यापलीकडे अतिक्रमण करणाऱ्यांनी काहीच केले नाही. इतक्या वर्षांपासून शहरात अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. मात्र, पालिकेने ही अतिक्रमणे कोणाच्या दबावामुळे काढली नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.मुख्य रस्त्यावरील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. अनेक इमारतींमधील बेसमेंटमध्ये अवैध बांधकाम करण्यात आले आहे. तसेच त्या बेसमेंटचा वापर व्यावसायिकासाठी करण्यात आला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर केवळ तात्पुरते बदल करून ये रे माझ्या मागल्या, असेच घडल्याचे दिसते. यादीत यांची नावेचर्तुभूज मेघराज राठी (भवानी पेठ),राजन ना. पोरे (शनिवार पेठ)विनीत विष्णू महाजनी (यादोगोपाळ पेठ)राजेश विश्वनाथ भोसले (यादोगोपाळ पेठ),राजेंद्र मधुकर चोरगे तर्फे मधुकर यादव कांबळे (मंगळवार पेठ)संजीवनी इन्टेसिटिव्ह केअर युनीट प्रा. कंपनी तर्फे डॉ. यशवंत पाटीलएन. एन. बिल्डर्स तर्फे फारुख अब्दुल नदाफरामचंद्र बापू भोसले (करंजे),सर्जेराव गणपती कदम (करंजेशशांक सुभाष शहा (करंजे)गजानन केशव उत्तेकर तर्फे सिद्धार्थ डेव्हलपर्सबसवराज चव्हाण (सदर बझार)डॉ. संजय कृष्णा घोरपडे (सदर बझार)साबांचे देऊळ तर्फे अपर्णा डेव्हलपर्स (सदर बझार)उर्मिला चंद्रशेखर चोरगे (सदर बझार)प्रकाश बाळा अडसूळ (करंजे)मे. जाधव-कंग्राळकर कन्स्ट्रक्शन (गुरुवार पेठ)जनता सहकारी बँक (भवानी पेठ)केदार दिनकर शालगर (शुक्रवार पेठ)हिमंत मोतीलाल मुथा (भवानी पेठ)पार्श्वनाथ सहकारी बँक (भवानी पेठ)जय भवानी नागरी पतसंस्था (रविवार पेठ)वर्षा प्रकाश कुलकर्णी (रविवार पेठ, उद्योग भवन)डॉ. शांतीलाल फिरोदिया (रविवार पेठ)डॉ. आर बी. देशपांडे (रविवार पेठ)डॉ. सुनील पटवर्धन (उद्योग भवन, रविवार पेठ), प्रशांत रमेश डागा, (भवानी पेठ).
अवैध बांधकामांवर खादी ‘मेहरबान’----वाहनतळही हरवले
By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST