शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मातीचं ॠण फेडायला धावले केरळी सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:59 IST

जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ज्या मातीत जन्मलो, त्या केरळ राज्यात सप्टेंबरमध्ये प्रलयकारी महापूर आला. क्षणात ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ज्या मातीत जन्मलो, त्या केरळ राज्यात सप्टेंबरमध्ये प्रलयकारी महापूर आला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्या मातीचं ॠण फेडण्यासाठी केरळी सातारकर पुढे सरसावले. जिल्ह्याच्या विविध भागांत विखुरलेल्या दोनशे कुटुंबांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल १ लाख, १७ हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.सातारा जिल्ह्यात केरळ राज्याच्या विविध भागांतून सुमारे दोनशे कुटुंबे आली आहेत. त्यांचा प्रमुख व्यवसाय गावोगावी बेकरी किंवा महामार्गावर टायर पंक्चर काढणे हा आहे. तर मोजकी कुटुंबं नोकरीच्या निमित्ताने आली आहेत. ही माणसं कष्टकरी आहेत.बेकरीत बायका-पोरंही राबत असतात. महामार्गाच्या कडेला कडक उन्हात गाड्यांचा धूर सहन करत दिवसभर थांबून पंक्चर काढावं लागतं. तेव्हा त्यांना रोजगार मिळतो. केरळ राज्याच्या विविध भागांतून, प्रांतातून साताºयात आलेल्या प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरू असली तरी ही समाज संघटनेच्या माध्यमातून ते एकत्र बांधले गेले आहेत. केरळी समाजम् सातारा ही संघटना कार्यरत आहे. वासुदेवन नायर हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. केरळमध्ये सप्टेंबरमध्ये महापूर आला. यामुळे मोठे नुकसान झाले. हे समजल्यानंतर अध्यक्ष नायर यांनी एक बैठक बोलावली. केरळी समाजबांधवांना मदत करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. यासाठी समाजाच्या नावे असलेल्या बँक खात्यात इच्छेनुसार वर्गणी देण्याचे आवाहन केले. केवळ एक-दोन वेळा पाठपुरावा केला असता १ लाख, १७ हजार रुपये जमा झाले.संघटनेचे पदाधिकारी ही मदत घेऊन केरळला गेले. आपत्तीग्रस्तांना काही जीवनाश्यक वस्तू देण्याचा संकल्प केला. तेथील परिस्थिती पाहिली असता वेगळेच चित्र दिसले. देशभरातून मोठ्या प्रमाणात मदत येत होती. परंतु तिच्या वितरणाचे नियोजन होत नव्हते. नुकसानीसमोर ही मदत खूपच तुटपुंजी होती. त्यामुळे साहित्य देऊन उपयोग होणार नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अध्यक्ष वासुदेवन नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.