शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळून केळघर घाट ठप्प

By admin | Updated: July 31, 2014 23:24 IST

धो-धो पाऊस : जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळीसह पाच धरणांतून सोडले पाणी

सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागाला आज, गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. केळघर घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर-मेढा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर धरणांतून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात आज मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील केळघर घाट (काळाकडा) येथील दरड सकाळी सहाच्या सुमारास कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे महाबळेश्वरच्या दिशेने येत असलेल्या एस.टी.तील प्रवाशांनी फोन करून याची माहिती महाबळेश्वर व मेढा पोलिसांना दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी आठनंतर जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली. तब्बल पाच तासांनंतर कोसळलेली दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत वाहतूक थांबविण्यात आली होती. या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ६.१२ टीएमसीने पाणी वाढले. संगमनगर धक्का पूल आज दिवसभर पाण्याखाली होता. धरणात ६७.६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोयना १९९, नवजा २२०, महाबळेश्वर २८०. तालुक्यातील नदी, ओढे व मध्यम प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. कोयना धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. धरणात ५३,६९५ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)