शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तारळे विभागात युवकांचा पहारा

By admin | Updated: July 4, 2015 00:11 IST

चोरट्यांची भीती : पोलिसांची रात्रगस्त; अनेकवेळा चकवा देत चोरटे पसार

तारळे : गेल्या तीन दिवसांपासून चोरांच्या एका टोळक्याने तारळे परिसरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक ठिकाणी चोरट्यांचे मनसुबे उधळले जात आहेत. गावातील युवक रात्रीचा दिवस करून रात्र जागून काढत आहेत. पोलिसांची संख्याही कमी आहे. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही दहशतीचे वातावरण आहे. परिसरातील गावांतून वेगवेगळ्या अफव्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तारळे गावात सोमवारी रात्रीपासून चोरट्यांच्या टोळीने चोरी करण्याचे प्रयत्न केले. एका ठिकाणच्या चोरीदरम्यान सर्व ठिकाणी लोकांच्या जागरूकतेमुळे त्यांचे प्रयत्न फसले. बुधवारी रात्रीही हायस्कूलच्या पाठीमागे नदीच्या परिसरात टेहळणी करणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास काही चोरटे आले; पण अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. रात्री दीड वाजेपर्यंत चोरट्यांचा शोध सुरू होता. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनोळखी व संशयित व्यक्तींचा तपास पोलिसांबरोबरच ग्रामस्थही करीत आहेत. पोलिसांकडून तारळे परिसरात डोंगराच्या कडेने तपास सुरू असून, अजूनपर्यंत हाती काहीच न लागल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. तारळे परिसरात बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे आठवडाभरापासून राहुडे, कडवे परिसरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरटे परप्रांतीय असून, दुचाकीवरून जाताना अनेकांच्या निदर्शनास आले आहेत. फारशी कल्पना नसल्याने त्यांना कुणीही हटकले नाही; मात्र चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांना याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे सतर्क राहून प्रत्येकजण संशयितांशी व अनोळखी व्यक्तींची पोलिसांना कल्पना देत आहे. राहुडे, तारळेच्या दरम्यान डोंगरापर्यंत उसाचा पट्टा व झाडी असल्याने चोरट्यांचे टोळके तिथेच तळ ठोकून असल्याची शक्यता गृहित धरून तरुणांच्या मदतीने पोलिसांनी कसून तपासणी केली; पण चोरट्यांचा काहीच माग लागला नाही. (वार्ताहर)चोरट्यांना झाडाझुडपांचा आश्रय..दोन-तीन वेळा नजरेस पडूनही झाडाझुडपांचा आश्रय घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ थांबविण्यात व त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.