शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:44 IST

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ ...

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केले.सातारा नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृृती सामाजिक पुरस्कार अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना शाहू कला मंदिर येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते आणि खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सातारी कंदी पेढे असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ‘अंनिस’च्या माध्यमातून सर्व जगाला मोठा मंत्र दिला आहे. त्यांच्या विचारामध्ये समाजाला घडविण्याची क्षमता आहे.’ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, ‘नरेंद्र दाभोलकरांनी विवेकाची वाटचाल सुरू ठेवली आहे. ती आजतागायत सुरू आहे.’ खासदार उदयनराजे म्हणाले, ‘डॉ. दाभोलकरांची आजही उणीव भासत आहे. ते चांगले खेळाडूही होते. विचारांची लढाई त्यांनी विचाराने लढली. त्यांचे कार्य आपण सर्वांनी समाजापुढे न्यावे.’दाभोलकरांचे कार्य प्रत्येकाने पुढे न्यावेज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, ‘जग अत्यंत वेगाने पुढे चालले आहे. वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली जात आहेत. शंभर वर्षांत जेवढी स्थित्यांतरे घडली नाहीत, तेवढी केवळ गेल्या दहा वर्षांत घडली आहेत. इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणसाची विचार करण्याची क्षमता मजबूत नसेल तर समाज व्हावत जाईल, अशी भीती व्यक्त केली. तसेच डॉ. काकोडकर यांनी दाभोलकरांचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन यावेळी केले.