शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी स्वच्छता राखा

By admin | Updated: June 16, 2015 01:23 IST

जनजागृती गरजेची : पत्रकार परिषदेत सचिन सारस यांचे आवाहन

सातारा : शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ निर्माण झाली असून पालिकेच्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहरात स्वच्छता करताना नागरिकच विरोध करत आहेत. परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होणे गरजेचे असून नागरिकांनी पालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सचिन सारस यांनी पत्रकार परिषदेत केले.डेंग्यू, चिकनगुण्या रोग नियंत्रण जनजागृती मोहिमेसंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या कक्षात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपनगराध्या दीपाली गोडसे, मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य समिती सभापती, जिल्हा हिवताप अधिकारी डी. एस. गंबरे, अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.नगराध्यक्ष सारस म्हणाले, ‘नागरिकांनी गरजेपुरते पाणी साठवावे. जास्त दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. डास चावल्यामुळे डेंग्यू, चिकनगुण्या, हिवताप तसेच साथीचे आजार पसरतात. यासाठी नागरिकांनी घरगुती पाणीसाठे, बॅरल, हौद, गच्चीवरील टाक्या आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ कराव्यात. दूषित पाणीसाठ्यात टेमि फॉस या अळीनाशकाचा वापर करावा. ताप आल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी. रक्ताची तपासणी व औषधोपचार जिल्हा रुग्णालय व पालिकेच्या गोडोली, सदर बझार येथील उपकेंद्रात विनामूल्य उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वत:चे घर, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन उपनगराध्यक्षांनी केले.मुख्याधिकारी बापट म्हणाले, ‘साथीच्या आजार, दूषित पाणी आढळल्यास तत्काळ नगरपालिकेत संपर्क साधावा.’ जिल्हा हिवताप कार्यालयाला पुरेसे मनुष्यबळ व औषधसाठा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे हिवताप अधिकारी डी. एस. गंबरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)