शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘अजिंक्यतारा’चा रस्ता टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:49 IST

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या ...

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. मात्र, संवर्धनाअभावी या किल्ल्याची दुरवस्था होत चालली आहे. देशभरातील हजारो पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. मात्र, किल्ल्याकडे जाणारा रस्ताच पूर्णपणे उखडल्याने पर्यटकांना तसेच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहन किल्ल्यावर नेण्याऐवजी अनेक पर्यटक व नागरिक चालत जाणेच पसंत करतात. रस्त्याकडेला असलेली सुरक्षा रेलिंगही तुटल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत होता.किल्ल्याचा या परिस्थितीबाबत अनेकदा आवाज उठविण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला.अखेर शासनाकडून या रस्त्याच्या कामास हिरवा कंदील देण्यात आला. नुकताच या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. गोडोली अजिंक्यतारा प्रवेश कमान ते किल्ला प्रवेशद्वार या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्यताºयावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे सातारकरांमधून नाराजी व्यक्त होत होती.वनविभागाची परवानगी गरजेचीअजिंक्यतारा किल्ल्याचा काहीसा भाग हा वनविभागाच्या हद्दीत आहे. ही बाब बांधकाम विभागाला अडचणीची ठरणार आहे. वनविभागाने परवानगी दिली तरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देण्यात आली असून, वनविभागाच्या परवानगी शिवाय कामास प्रारंभ करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.पर्यटकांचा मार्ग सुकरकास पठार, सज्जनगड, ठोसेघरला भेट देणारे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देतात. परंतु खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्यावर येणे टाळतात. रस्त्याचे मजबुतीकरण केल्यानंतर पर्यटकांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. रस्ता दुरुस्तीनंतर पर्यटनविकासाला चालना मिळणार आहे. पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.