शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कासचा पाणीसाठा अठरा फुटांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:54 IST

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असून, पाणी पातळी खालावू लागली आहे. सद्य ...

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असून, पाणी पातळी खालावू लागली आहे. सद्य स्थितीत तलावात अठरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी नोव्हेबरच्या पूर्व पंधरवड्यात कास तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहणे थांबले होते; परंतु यंदा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कास तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहणे थांबले आहे.

कास तलावात किनाऱ्यालगत पंचवीस फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस एकोणीस फूट दोन इंच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला सध्या ही पाणीपातळी अठरा फूट एक इंचावर आली आहे. यंदा परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमी-कमी होत गेल्याने गतवर्षीपेक्षा यंदा एक फुटाने पाणीसाठा कमी शिल्लक आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दोन दिवसांला तलावातील पाणीपातळी एक ते दीड इंचाने कमी होत आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून रहावा, यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. सद्य स्थितीला तलावातील पाणीसाठा पाहता, जानेवारी महिन्यात तलावाचा पहिला व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोट..

सध्या कास तलावात अठरा फूट एक इंच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा परतीचा पाऊस कमी झाल्याने तलावात गतवर्षीपेक्षा एक फूट पाणीसाठा कमी आहे. यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.

-जयराम कीर्दत, पाटकरी, कास तलाव

चौकट..

सर्वात खालच्या व्हॉल्व्हवर जाळी...

एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस उघडा पडला होता. साधारण एप्रिल अखेरीस ते मे महिन्याच्या सुरुवातीस दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला जातो. दगड अथवा अन्य कोणतीही वस्तू अडकून पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कित्येक वर्षांपूर्वी पालिकेने सर्वात खालच्या व्हॉल्व्हवर जाळी बसविलेली आहे.

फोटो..

०१कास

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असून, पाणी पातळी खालावू लागली आहे.