येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
या कोविड रुग्णालयात ३२ आयसीयू बेड व ३१ ऑक्सिजन बेड असे एकूण ६३ बेड आहेत. यामधील सुरुवातीला ३२ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार असून, काही दिवसानंतर आयसीयू बेड कार्यान्वित करण्यात येणार आहे. सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेमार्फत या कोविड रुग्णालयात आरोग्यसेवा दिल्या जाणार आहेत. या रुग्णालयात कोविड रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
काशीळ येथील कोविड रुग्णालय हे मोक्याच्या ठिकाणी असून, परिसरातील नागरिकांबरोबर कराड व सातारा तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळणार आहे. शासनाने हॉस्पिटल सुरू केले आहे. या रुग्णालयासाठी नियमित कर्मचारी द्यावेत, हे रुग्णालय सुरू केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले.
फोटो ओळ : सातारा तालुक्यातील काशीळ येथे उभारण्यात आलेल्या गोविल रुग्णालयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार पृथ्वीराज चव्हाण आदींची उपस्थिती होती.