शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘कास’मध्ये वाढणार अडीचपट पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:40 IST

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले ...

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून, सध्याच्या तुलनेत धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा अडीचपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे सातारकरांना भेडसावणारे पाणीसंकट आता संपुष्टात येणार आहे.सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास ही सर्वांत जुनी पाणीपुरवठा योजना असून, या धरणातून शहराला दररोज ५.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू होताच पातळी खालावू लागते व पाणीसाठा ५ ते ६ फुटांवर येतो. वाढते शहरीकरण आणि पाण्याची दैनंदिन गरज पाहता १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले.पहिल्या टप्प्यात जुन्या धरणाच्या भिंतीपासून साठ मीटर अंतरावर नदीपात्रात नवी भिंत उभारण्यासाठी खोदकाम करण्यात आले. या व्यतिरिक्त धरणाच्या समोरील बाजूस नव्या पाईपलाईनसाठीचे खोदकाम पूर्ण झाले. पाण्याच्या दाबाने धरणाचे स्लायडिंग होऊ नये, यासाठी महत्त्वाचा भाग असणाऱ्या दगडी कोपºयाचेही काम पूर्णत्वास आले आहे.जुन्या माती धरणाची माथा पातळी १ हजार १२५.५८ मीटर तलांक इतकी आहे. परंतु धरणात १ हजार १२२.४० मीटरपर्यंत पाणी अडवले जात होते. यंदा १ हजार १२८ मीटर तलांकापर्यंत पाणी अडविले जाणार असून, यामध्ये ५.६० मीटरने वाढ होणार आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा नेहमीपेक्षा अडीच पटीने वाढणार असून, सातारकरांना पाण्याची कोणतीही कमतरता आता भासणार नाही.