शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

‘कास’ आटला; पर्यटकांचा पूर !

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

सलग सुट्यांमुळे गर्दी : पर्यटकांनी लुटला पोहण्याचा मनसोक्त आनंद

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सर्वांचेच आकर्षण असणाऱ्या कास पर्यटनस्थळी सलग सुट्टया व उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे परिसर पर्यटकांनी बहरून गेला आहे. कास तलावावर नुकतेच साकारलेल्या बेटावर पर्यटक मनमुराद आनंद लुटत जणू काही आज कासबरोबर स्वर्गच साकारल्याची आगळी वेगळी पर्वणी पाहावयास मिळत होती.कास तलावात सध्या साडेसात फूट पाणीसाठा शिल्लक असून पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने सध्या दिवसातून आठ ते दहा वेळा इंजिनद्वारे व धरणावरचे पाणी एकत्रित सोडले जात आहे. कास तलावातील पाणीपातळी खालावल्याने कित्येक ठिकाणी जमिनी उघड्या पडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच कास तलावाला बेटाचे स्वरूप आले होते. सध्या तर तलावात शनिवार, रविवर सुट्टया तसेच उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपत आल्याने परगावहून आपापल्या पाहुण्यांकडे आलेल्या नातेवाईकांनी कास तलावावर मोठी गर्दी केली होती. तलावावर साकारलेल्या बेटावर पर्यटक आपापल्या वाहनांसमवेत मनमोहक निसर्गाचा आनंद लुटत येथील दृष्य कॅमेऱ्यात टिपत आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी जलविहाराचा आनंदही लुटला. (वार्ताहर)२० दिवस पुरेल एवढेच पाणी कास तलावाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा वेळा इंजिनद्वारे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील पाणी तिसऱ्या व्हॉल्व्हवरील संरक्षक जाळीच्या खाली आले आहे. धरणाची पाणीपातळी आठ फुटांवरून कमी होऊन साडे सात फुटांवर आली आहे. केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी सध्या धरणात शिल्लक आहे. जर मान्सून वेळेवर आला नाही तर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.