शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीर पथावर, वटवृक्षाखाली क्रोधनाट्य

By admin | Updated: November 12, 2014 22:56 IST

उदयनराजेंचे उपोषण : समर्थकांचा जोश, पोलिसांची धावपळ आणि कावरेबावरे सातारकर

सातारा : संयमाचा महामेरू मानले गेलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव दिलेल्या रस्त्याने, वटवृक्षाच्या छायेतच बुधवारी क्रोधनाट्य अनुभवले. थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान देणारे खासदार उदयनराजे, प्रचंड घोषणा देणारे त्यांचे समर्थक, धावपळ करणारे पोलीस कर्मचारी, ठप्प झालेली वाहतूक आणि या साऱ्यातून सातारच्या गुंडगिरीवर तोडगा निघणार का, असा प्रश्न चेहऱ्यावर घेऊन हे सगळे पाहणारे कावरेबावरे सातारकर, असे चित्र पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर होते.सकाळी साडेदहापासूनच खासदार उदयनराजेंचे समर्थक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर येण्यास प्रारंभ झाला. यात उपनगराध्यक्षा दिनाज सय्यद आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांचा समावेश होता. सव्वाअकरा वाजता उदयनराजे उपोषणस्थळी येताच समर्थकांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. ‘एक नेता, एक आवाज... उदयनमहाराज, उदयनमहाराज,’ ‘उदयनराजे अंगार है, बाकी सब भंगार है,’ ‘उदयनराजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा समर्थक देत होते.दरम्यान, याच वेळी एकेरी वाहतूक सुरू होती. मोती चौकातून पोवई नाक्याकडे येणारी वाहने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अलीकडे अडविण्यात आली. तेथून पोलीस करमणूक केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याने ती राजपथाकडे वळविण्यात आली.उदयनराजे उपोषणस्थळी स्थानापन्न होताच समर्थकांनीही तेथेच ठाण मांडले. सुमारे शंभर जणांनी उपोषण सुरु केले. वटवृक्षाच्या सावलीत कार्पेट अंथरले होते. त्यावर उपोषणकर्ते बसले होते. त्यांच्या भोवताली सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. वटवृक्षाच्या पारावर आणि आजूबाजूच्या कुंपणभिंतींवर उभे राहून नागरिक उदयनराजेंना समर्थन देत होते. काही जण तर झाडावर चढून पाहत होते. सुमारे वीस मिनिटांनी पोलीस अधीक्षकांनी उदयनराजेंची उपोषणस्थळी येऊन भेट घेण्यास नकार दिला आणि संतापाने उदयनराजे तेथून निघून गेले. यावेळी ते त्यांच्या मोटारीतून न जाता, त्यांच्या कार्यकर्त्याने आणलेल्या मारुती व्हॅनमधून गेले. उदयनराजे नेमके कोठे गेले, याचा अंदाज पोलीस, नागरिक आणि पत्रकारांनाही लागेना. त्यामुळे मारुती व्हॅनच्या मागून अनेकांनी दुचाकीवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची एक व्हॅनही शोधार्थ निघाली. शासकीय विश्रामगृहावर धडक मारून काही जण सातारा क्लबच्या इमारतीत गेले. तेथे उदयनराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बोलत उभे होते. काही वेळाने तेथूनही ते कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले. नंतर ते कोणालाच दिसले नाहीत.उदयनराजे पुन्हा उपोषणस्थळी येतील अशा आशेने काही कार्यकर्ते अधीक्षक कार्यालयासमोरच घुटमळत होते. ऊन वाढू लागल्यावर एकेक कार्यकर्ता तेथून निघून गेला. दरम्यान, उदयनराजे जे निवेदन देण्यासाठी आले होते, ते त्यांच्या समर्थकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले. साडेबारापर्यंत सर्वच कार्यकर्ते तेथून गेलेले होते. पाऊणला उपोषणस्थळी अंथरलेले कार्पेट गुंडाळण्यात आले आणि सारे काही शांत-शांत झाले. (प्रतिनिधी)नगरविकास आघाडीची पाठसातारा पालिकेत सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीच्या मनोमिलनाची सत्ता आहे. शहरातील गुंडगिरीविरोधात उदयनराजेंप्रमाणेच शिवेंद्रसिंहराजेंनीही आवाज उठविला होता. तथापि, विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही आघाड्यांमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असे वातावरण आहे. त्यातच उदयनराजेंनी मंगळवारी पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजेंना पराभवाची मीमांसा करण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर, नगरविकास आघाडीचे नगरसेवक अपेक्षेप्रमाणेच उपोषणस्थळी फिरकले नाहीत. नगराध्यक्ष सचिन सारस यांना यासंदर्भात विचारले असता, ‘मी बाहेरगावी गेलो होतो,’ असे उत्तर त्यांनी दिले.पोलिसांची होणार पंचाईतखासदार उदयनराजेंनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे दिल्या आहेत. यात दमदाटी, खंडणी, शिवीगाळ, मारामारी अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु या प्रत्येक अर्जाची शहानिशा करून अर्जात नमूद केलेली तक्रार खरोखरच दखलपात्र आहे का, हे पोलिसांकडून पाहिले जाईल. किरकोळ दमदाटी, शिवीगाळ असेल तर पोलिसांना अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यावाचून पर्याय राहणार नाही. दरम्यान, ‘कुणी का रे म्हटलं तरी तक्रार द्या,’ असे विधान खुद्द अधीक्षकांनीच केल्यामुळे पोलिसांची दुहेरी कोंडी होणार आहे. परिणामी अशा गुंडांवर पोलिसांना कायद्याच्या चौकटीत कारवाई करता न आल्यामुळे उदयनराजे समर्थकांमध्ये रोष वाढण्याची शक्यता आहे.कडेकोट पोलीस बंदोबस्तउदयनराजेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. एवढेच नव्हे तर ‘मेटल डिटेक्टर’ही मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रथमच पाहायला मिळाला. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी लाठीधारी पोलीस उभे होते. मुख्यालयात कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. शिवाय वाहतूक वळविल्याने अनेक पोलीस कर्मचारी त्या कामात गुंतले होते.एसपींनी सर्वांनाच नाकारली भेटपोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज, तक्रारी देण्यासाठी अनेकजण दररोज येतात. बुधवारीही अनेकजण भेटण्याच्या वेळेत तेथे उपस्थित होते. तथापि, एसपी आज कोणालाच भेटणार नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे ताटकळत बसलेल्या तक्रारदारांची निराशा झाली. ‘त्या’ यादीतील गुंड कोण-कोण?उदयनराजेंनी पोलिसांना १५ हून अधिक तक्रारी सादर केल्या आहेत. त्यात शहरातील अनेक गुंडांच्या नावांचा समावेश आहे. त्या यादीत कोणाकोणाची नावे आहेत, हे पोलिसांनी अतिशय गोपनीय ठेवले आहे. प्रसारमाध्यमांनाही या नावांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या यादीतील गुंड कोण, याविषयी सातारकरांमध्ये उत्सुकता आहे.खासदार उदयनराजे यांच्यासमवेत उपनगराध्यक्षा दिनाज शेख, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, साविआचे नगरसेवक, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.उदयनराजेंचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपोषणस्थळी येण्यास पोलीस अधीक्षकांनी नकार दिल्याने उदयनराजे त्वेषाने उठले आणि थेट पोलीस यंत्रणेला त्यांनी इशारे दिले.खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी परिसरात प्रचंड गर्दी जमली होती.