शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात कर्मवीर चौक वडापने घेरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:39 IST

पोलीस तेथे तैनात असतानाही अस्ताव्यस्त रिक्षा लावल्या जात असून, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या शहरातील चौक वडाप ...

पोलीस तेथे तैनात असतानाही अस्ताव्यस्त रिक्षा लावल्या जात असून, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या शहरातील चौक वडाप वाहनांनी घेरले असल्याचे दिसत आहे.

शहरातील कर्मवीर चौक, दत्त चौकासह भेदा चौकात काही रिक्षाचालकांकडून मुद्दामपणे रिक्षा आडव्या लावल्या जात आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी विचारणा केली, तर त्यांना उलट उत्तरे दिली जात आहेत. पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बसस्थानक परिसरात बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईचा दंडुका हाती घेणे गरजेचे आहे. बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेकदा प्रवासी ये-जा करण्यासाठी रिक्षांचा वापर करतात. मात्र, स्वत:च्या वाहनाने, दुचाकीने बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अशा विविध मार्गांनी येणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकात जाण्यासाठी दररोज अस्ताव्यस्तपणे उभ्या होणाऱ्या रिक्षांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, पुतळ्याच्या परिसरातील रिक्षा व्यावसायिकांचाही उद्योग अशाचप्रकारे चालला आहे.

मलकापूर परिसरात जाणाऱ्या रिक्षा तर त्यांचा थांबा सोडून रस्त्यावरच प्रवाशांना घेतात. त्याचबरोबर पुतळ्यासमोरच असलेल्या रिक्षा थांब्यावर अनेकदा रिक्षांच्या दोन-दोन रांगा केल्या जातात. तेथेच सिग्नलही असल्याने

या सर्व रिक्षांचा अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत

आहे.

- चौकट

वाहतूक पोलिसांसमोरच मनमानी

वाहतूक पोलिसांसमोरच हा प्रकार घडत असताना त्यांच्याकडूनही काहीच उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता बसस्थानकाबाहेरील बिघडलेल्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चौकट

पादचारी मार्गालगत यांचीच सत्ता

कऱ्हाड शहरातील बसस्थानक परिसरातील पादचारी मार्गाला लागूनच हे वडाप व्यावसायिक आपली वडाप वाहने उभी करीत आहेत. मंगळवारी तर यांच्याकडून पादचारी मार्गावरच आपली वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

- चौकट

कॉलेजवाल्यांची वेगळीच तऱ्हा

बसस्थानकापासून विद्यानगरला (कॉलेज) जाणाऱ्या रिक्षा अलंकार हॉटेलसमोर उभ्या असतात. कर्मवीर चौकापासून ते विजय दिवस चौकापर्यंत रस्त्यातच उभे राहून हे रिक्षाचालक प्रवाशांसाठी आरडाओरडा करीत असतात. कधीकधी प्रवासी तुझा की माझा, यावरून त्यांच्यात हमरीतुमरीही होते. त्यामुळे त्याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

फोटो : १५केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडात बसस्थानकानजीक असलेल्या कर्मवीर चौकाला वडाप वाहनांसह रिक्षांनी घेरले असून, प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.