शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला नगरसेवक गटांचा ‘षटकार’ !

By admin | Updated: August 29, 2014 23:14 IST

विधानसभेमुळं बिघडलं : दोन्ही आघाड्यांत धुसफूस

कऱ्हाड : पालिकेच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील गटाची सत्ता आली़ मुख्यमंत्री समर्थकांना विरोधी बाकावर बसावं लागलं़ त्यामुळे पालिकेत सत्ताधारी आणि विरोधी असे दोनच गट दिसत होते; पण विधानसभेचे पडघम वाजायला लागताच सध्या अनेकांच्या अंगात आले असून, ‘एक एकसे भले दो... दो से भले तीन’ नव्हे तर चक्क सहा गट पडले आहेत. राजकीय वर्तूळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे़ निवडणुकीत मुख्यमंत्री समर्थक यशवंतराव चव्हाण ‘कृष्णा’ आघाडीच्या माध्यमातून ‘जनशक्ती’ समोर गेले़ तर बाळासाहेब समर्थकांच्या लोकशाही आघाडीशी यादवांची विकास आघाडी एकवटली अन् आमदार गटाने २१ जागा मिळवित बाजी मारली तर मुख्यमंत्री समर्थक गटाला आठ जागांवरच नाट लागला़ पालिकेत अडीच वर्षांनंतर नवीन नगराध्यक्ष बदलही बिनविरोध झाला़ मात्र विरोधी नेते पदावरून विरोधकांच्यातच माशी शिंंकली़ त्याला विधानसभा निवडणुकीचे रंग दिसू लागले़ हळूहळू विरोधी आघाडीसह सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांचे रंगही बदलल्याचे दिसत आहे़ विरोधी आघाडीतील नगरसेवक विक्रम पावसकर यांनी भाजप प्रवेश केल्याने नगरसेवक पिता-पुत्रांच्या हातात कमळ दिसू लागले आहे़ महादेव पवार व अन्य एक नगरसेवक डॉक्टरबाबांचे नेतृत्व मानतात, तर शारदा जाधव, स्मिता हुलवान, श्रीकांत मुळे व सहकारी मुख्यमंत्री बाबांबरोबर दिसत आहेत़.असे एकूणच विरोधी आघाडीचे त्रिभाजन दिसतंय़ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे दक्षिणेवर स्वारीची तयारी चालविल्याने त्यांच्या आघाडीतही धुसफूस वाढली आहे़ माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक जयवंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी आघाडीच्या मेळाव्याकडेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे़ निवडणुकीत लोकशाहीबरोबर तह करणाऱ्या यादवांनी आपल्या विकास आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणार असल्याची भूमिका घेतल्याने पालिकेत सध्या नगरसेवकांचे सहा गट दिसत आहेत़ (प्रतिनिधी)विरोधी पक्षनेते पदाचा वाद सुरूच अडीच वर्षांनंतर पालिकेत नगराध्यक्ष बदलानंतर विरोधी पक्ष नेते पदाच्याही हलचाली झाल्या. सुरुवातीपसून महादेव पवार यांच्याकडे हे पद आहे; पण, काही नगरसेवकांनी स्मिता हुलवान यांच्या नावाचं पत्र विरोधी पक्षनेते म्हणून प्रशासनाकडे दिल्याने वाद सुरू झाला़ पालिकेच्या एका बैठकीतही त्यावर खरमरीत चर्चा झाली; पण पवार अन् हुलवान यांचा नेतेपदाचा दावा आजही सुरू आहे़ यादव गटाची भूमिका गुलदस्त्यात गुरुवारच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवणाऱ्या उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या गटाची भूमिका अद्याप तरीगुलदस्त्यात आहे़ लवकरच यादव गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होऊन त्यात विधानसभेची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजते़