शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कऱ्हाडचे राजकारण तासवडेच्या टोलनाक्यावर !

By admin | Updated: August 26, 2016 01:13 IST

ठेका बदलाचं वारं वाहतंय उलटसुलट : ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’ अजूनही ‘सिंहा’कडे; पण नाक्यावर पाटील‘की’ मंगळवारातली?

प्रमोद सुकरे- कऱ्हाड --पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे येथे वाहनांसाठीचा टोलनाका उभारण्यात आला आहे. शासनाकडून त्याच्या टोल वसुलीचा ठेका खासगी कंपनीला दिला जातो. कंपनी कोणतीही असो; पण येथील कर्मचाऱ्यांचा ठेका मात्र गेली सहा वर्षे कऱ्हाडचा एक ‘सिंह’च सांभाळत आहे. नुकतीच जुन्या कंपनीची मुदत संपून हा मूळचा ठेका ‘सहकार ग्लोबल’ कंपनीने मिळविला आहे. मात्र या ठेका अदलाबदलीचे वारे कऱ्हाडात उलट-सुलट वाहू लागल्याने शहराचे राजकारण तासवडेच्या टोल नाक्यावरच पोहोचल्याची चर्चा आहे.महामार्गावरील टोलनाके ठेकेदारांसाठी सुवर्णसंधीच मानली जाते. मग तो संपूर्ण ठेका असो वा फक्त कामगारांचा. साताऱ्याच्या थोरल्या राजेंचं छत्र लाभलेल्या कऱ्हाडच्या एका ‘सिंहा’ला गेल्या सहा वर्षांपासून या टोल नाक्याच्या कामगारांचा ठेका मिळाला आणि त्यांच्या आर्थिकसोबत राजकीय दबदबाही वाढला. तरुणांचं चांगलं नेटवर्क उभं राहिल्यानं शहराबरोबर तालुक्यातही त्याचे वारे वाहू लागले. टोलच्या ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’च्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय मार्गही सुकर क रून घेतला नसेल तर नवलच. तासवडे टोलनाका आणि कऱ्हाडचा ‘सिंह’ असे जणू समीकरणच झाले असताना महिन्याभरापूर्वी मूळच्या जुन्या कंपनीच्या ठेक्याची मुदत संपली. शासनाने नव्याने निविदा मागविल्या; मात्र, यात ‘सहकार ग्लोबल’ कंपनीने बाजी मारली. कंपनी कोणतीही असली तरी कामगार ठेक्याला अडचण कसली? अशी या ‘सिंहा’ची भूमिका; पण कोणत्याही पीचवर खेळी करण्यात पटाईत असणाऱ्या कऱ्हाडातील ‘पाटील’ टीमचे खेळाडू या मैदानात उतरले. नव्या कंपनीतच भागीदारी मिळविलेल्या या खेळाडूंनी अगोदरच अर्धे ‘रण’ ‘जीत’ले होते. कंपनी बदलली, आता कामगार ठेकाही बदलणार या चर्चेनंतर कामावरील अस्वस्थ तरुणांनी आपल्या ‘सिंह’रूपी राजाकडे धाव घेतली. त्यांच्यात गेले महिनाभरात कऱ्हाडात वारंवार ‘संगम’ झाला; पण ‘युद्धाबरोबर तहातही जिंकणं’ ज्यांना जमतं ते ‘विजय’ मिळवितात, हे माहीत असलेल्या भावांनी ‘लांब उडी मारायची असेल तर दोन पावले मागे घेतली’ अन् नव्या कंपनीतील नव्या भागीदारांसोबतच चर्चा करीत या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केलाय; पण विषय येथेच संपलाय का? हे कळण्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार, हे निश्चित.काका, दादा, बापूही हजर !टोलनाक्यावरचा ठेका बदलल्यानंतर नव्या कंपनीने ‘सेलिब्रेशन’ केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करीत त्यांनी श्रीफळ वाढविले. त्यावेळी मंगळवारातील ‘काका’, ‘दादा’, ‘भाऊ’, ‘बापू’सारे झाडून हजर होते. महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर गेली अनेक वर्षे राज्य करणाऱ्या ‘सिंह’ रूपी ‘राजा’ला हे किती पचनी पडलंय, हा संशोधनाचा विषय आहे.