शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कऱ्हाडात ठेकेदाराकडूनच वृक्षांवर कुऱ्हाड !

By admin | Updated: August 8, 2016 23:40 IST

पर्यावरणप्रेमींची आक्रमक भूमिका : गटर बांधकामासाठी एकोणतीस वृक्ष तोडले; मुख्याधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस

कऱ्हाड : येथील दत्तचौक ते कृष्णा नाका मार्गावर रस्ता रूंदीकरण कामावेळी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडून पालिकेची परवानगी न घेता तब्बल २९ वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने तोडले असल्याचे सोमवारी निदर्शनास आले. दरम्यान, सोमवारी, दुपारी बारा वाजता कऱ्हाड अर्बन बँक परिसरातील पाच वृक्ष ठेकेदाराने तोडल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आल्यानंतर ठेकेदारावर पालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य मानद वन्य जीवरक्षक रोहन भाटे व पर्यावरण प्रेमी नाना खामकर यांनी मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास दोन दिवसात याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित ठेकेदाराकडून कऱ्हाड शहर पोलिस स्टेशन ते राजर्षी शाहू महाराज चौक या रस्त्याकडेला नाले बांधकाम केले जात आहे. सोमवारी ठेकेदाराने या मार्गावरील दोनशे मीटर अंतरामध्ये असलेली पिंपरणीचे पाच वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने तोडले. वृक्षतोडीसाठभ ठेकेदाराने वनविभाग तसेच पालिका प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे, पर्यावरणप्रेमी नाना खामकर, पालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे प्रमुख मिलिंद शिंदे यांनी विरोध दर्शविला. तसेच सदरचे काम थांबवले.याची माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना दिल्यानंतर त्यांनी नगरअभियंता एम. एच. पाटील यांना याबाबत अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार नगरअभियंता पाटील यांनी वृक्षतोडीचा अहवाल सादर केला. त्यानंतर मुख्याधिकारी औंधकर यांनी ठेकेदारास वृक्षतोडीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरूवातीला रस्त्याकडेला नाले बांधकाम केले जात आहे. दरम्यान, या कामामध्ये १५ मीटर रस्त्याची रूंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रूंदीचा दुभाजक केला जाणार आहे. रस्ता रूंदीकरणामध्ये अडीचशे वृक्ष येत असल्याने त्यांच्यावर ेकुऱ्हाड पडणार होती. मात्र, यास वृक्षप्राधिकरण समितीच्यावतीने विरोध केला व पालिकेने वृक्षतोड न करता रस्ता करावा, अशी मागणी केली. त्याबाबत निर्णय न झाल्याने कृष्णानाका ते दत्तचौक या मार्गावर पादचारी मार्गाखालील नाला बांधकामावेळी ठेकेदाराने वृक्ष तोडले. (प्रतिनिधी)वृक्षतोडी विरोधात असा आहे गुन्हा.......‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन १९७५’ या कायद्यांतर्गत वृक्षांसंदर्भातील तरतुदीचे उल्लंघन करून झाड तोडणे, झाड तोडण्यास कारणीभूत होणे, आदेश पालनात कसूर आणि कर्तव्य पालनात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला अपराध सिद्ध झाल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. गुन्हेगारास दिला जाणारा कारावास एक आठवड्यापेक्षा कमी आणि एक वर्षापेक्षा जास्त नसेल. त्याचबरोबर दंडाची रक्कमही प्रत्येक अपराधाकरिता एक हजार ते पाच हजार रूपयांपर्यंत असेल. याशिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत देखील आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो.संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा !सोमवारी संबंधित ठेकेदाराकडून शाहू चौक ते कऱ्हाड शहर पोलिस स्टेशन मार्गावर २०० मीटर अंतरावर पाच वृक्ष तोडण्यात आले. त्यापूर्वी दत्तचौक ते कृष्णा नाका मार्गावरील अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. याबाबत वनविभाग अथवा पालिकेची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदाराने ती घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर पालिका प्रशासनाने वृक्ष अधिनियमचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मानद वन्यजिव रक्षक रोहन भाटे व पर्यावरणमित्र नाना खामकर यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.