ओगलेवाडी, ता. कऱ्हाड येथील आत्माराम विद्यालयास खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून क्रीडांगण व व्यायामशाळेच्या निर्मितीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी खासदार पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, शिक्षण मंडळ संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांचे पहिल्यापासूनच संस्थेवर प्रेम आहे. वेळोवेळी संस्थेच्या विविध समारंभ व कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असतेच. मार्गदर्शनही लाभते. भविष्यातही त्यांचे मार्गदर्शन लाभेल, याची खात्री आहे. संस्थेची वाटचाल गतिमान झाली आहे. विविध कोर्सेस सुरू करून संस्थेच्या विस्तारात भर टाकण्यात पदाधिकारी व कौन्सिल सदस्य विशेष योगदान देत आहेत. सर्व काही एकाच छत्राखाली अशी नवीन ओळख निर्माण करणारी जिल्ह्यातील एकमेव शिक्षणसंस्था असा नावलौकिक मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी सचिव चंद्रशेखर देशपांडे यांचेही भाषण झाले. संस्थेला यापुढेही सहकार्य राहील, अशी ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी दिली.
फोटो : १९केआरडी०३
कॅप्शन : ओगलेवाडी, ता. कऱ्हाड येथील आत्माराम विद्यामंदिरास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार श्रीनिवास पाटील यांचा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी व सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.