शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कऱ्हाडला कन्या शाळेच्या विद्यार्थिनी ४४ वर्षांनी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

कऱ्हाड : व्यक्तिमत्त्व विकासात शाळेतील संस्कारांचे स्थान अजोड असेच असते. व्यक्ती कितीही मोठी झाली, तरी तिला शाळेच्या ऋणात राहणेच ...

कऱ्हाड : व्यक्तिमत्त्व विकासात शाळेतील संस्कारांचे स्थान अजोड असेच असते. व्यक्ती कितीही मोठी झाली, तरी तिला शाळेच्या ऋणात राहणेच आवडते. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ या विचारांची सार्थकता शाळा ऋणातून काही अंशी उतराई होण्यातच असते, याचा प्रत्यय नुकताच आला. निमित्त होते, कऱ्हाडच्या लाहोटी कन्या प्रशालेत आयोजित ‘डिजिटल क्लासरूम प्रदान कार्यक्रमाचे!

कराडच्या लाहोटी कन्या प्रशालेतून १९७७ साली दहावी झालेल्या २५ विद्यार्थिनींनी ४४ वर्षांनंतर एकत्र येऊन स्वनिधीतून आपल्या शाळेला अद्ययावत डिजिटल क्लासरूम अर्पण करण्याचा सोहळा पार पडला. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शताब्दी समितीचे अध्यक्ष ॲड. सदानंद चिंगळे होते. शिक्षण मंडळाचे सहसचिव राजेंद्र लाटकर, कौन्सिल सदस्या अनघा परांडकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, "शिक्षण मंडळाच्या शाळांतील माजी विद्यार्थी व त्यांचे कर्तृत्व हीच शिक्षण मंडळाची खरी संपत्ती आहे. बदलत्या वातावरणात अतिशय उपयुक्त अशी डिजिटल क्लासरूमची भेट संस्थेच्या शताब्दी वर्षात देऊन विद्यार्थिनींनी खऱ्या अर्थाने शताब्दी योग साधला असल्याचे सांगितले,

रंजना मळेकर यांनी शारदास्तवन केले. विद्यार्थिनींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात वर्षा ढापरे यांनी मनोगत व्यक्त केले. कमल कुंभार व शैला कुलकर्णी या शिक्षिका या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या, तर त्यावेळच्या इतर शिक्षकांनी व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी संवाद साधला. या हृद्य प्रसंगाने विद्यार्थिनी भारावून गेल्या.

प्रत्येक वेळी आर्थिक मदतीची गरज असतेच असे नाही. आजी विद्यार्थी घडवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची मदत देऊ करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

शाळामाऊलीची भेट झाल्याचा आनंद माहेरवाशिणींच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत होता.

फोटो :